Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Aug 17th, 2019

  रामटेक येथे नवीन पोलीस चौकीचे उदघाटन

  रामटेक शहर प्रतिनिधी -रामटेक येथील अनेक दिवसापासून प्रलम्बीत प्रश्न ज्याची गाँधी चौकात खरी गरज होती अखेर नुकतेच आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते रामटेक गांधी चौक, स्टेट बँके जवळील पोलीस चौकीचे उदघाटन झाले .

  चौकामध्ये पोलीस चौकी असल्याने पोलिसांची तिथे सतत ड्यूटी असल्याने पार्किंग , ट्राफिक समस्या , रोड रोमियो तसेच इतर बाबींवर लगाम लागुण त्यांचेवर वचक बसेल असे ह्यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यानी सांगितले . इथे एक पोलीस उपनिरीक्षक , एक राइटर , दोन पोलीस कॉन्स्टेबल यांची ड्यूटी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले . आधीची पोलीस चौकी जी होती तिथे फ़क्त रात्री झौपण्याकरीताच पोलीस येत असे .

  असला प्रकार ह्यावेळी कदापीही चालणार नाही असे सांगून चौकीला आवश्यक तेवढा स्टाफ दिला जाईल अशी ग्वाही ह्यावेळी आमचे प्रतिनिधी शी बोलताना दिली .

  ह्यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष दिलीप देशमुख ,माजी भारतीय खाद्य निगम सदस्य विजय हटवार , नगरसेवक आलोक मानकर , रामानंद अडामे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सुनील दमाहे , शाखा अभियंता संदीप पाचकवडे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर ,हुसेनभाई मालाधारी , विनायक बांते , स्वप्नील दियेवार व मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145