Published On : Sat, Aug 17th, 2019

महिलांचा सन्मान आणि स्वातंत्र्य देश-समाजाला समृद्ध व बलशाली बनवेल :मान्यवरांचे उदगार

Advertisement

परमात्मा एक आनंद धामचा महिला मेळावा सम्पन्न

रामटेक : परमात्मा एक आनंद धाम रामटेक च्या वतीने स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन च्या शुभ पर्वावर महिला मेळावा अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.शितलामाता मंदिराजवळ महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत लक्ष्मणराव मेहर बाबूजी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी ,पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, संजय सत्येकार ,पी टी रघुवंशी, बिकेंद्र महाजन, डॉ योगेश राहाटे ,जेष्ठ परमात्मा एक सेवक व मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. या महिला मेळाव्यात व्यसनापासून मुक्तता मिळविण्यासाठी लोककलावंताच्या नृत्य व गायनाच्या कार्यक्रमातून संदेश देण्यात आला.

यावेळी महिला सेविकांनी सर्व मान्यवर मंडळीना रक्षाबंधननिमित्त राखी बांधून राखीचा सण सामूहिकरीत्या साजरा केला.आजचा दिवस खूप महत्वाचा असून देशाचा स्वातंत्र्य दिन आनी बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन साजरा करीत आहोत.

आपण समाजात वावरताना, राहतांना प्रत्येक माणसाच स्वातंत्र जपलं पाहिजे आणि प्रत्येकाचा मान-सन्मान केला पाहिजे.महिला भगिनीच्या सुरक्षेसाठी तरुणांनी सदैव तत्पर असले पाहिजे. प्रत्येक भारतीय महिला-मुलीचा सन्मान केला पाहिजे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व परमात्मा एक सेवक -सेविकांनी प्रयत्न केले.

Advertisement
Advertisement