Published On : Wed, Oct 24th, 2018

मुक मोर्चा काढुन न्यायालयाने दिलेल्या न्यायाची अमलबजावणी करण्याची मागणी

कन्हान : – आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समिति महाराष्ट्र अंतर्गत पारशिवनी, रामटेक, मौदा तालुका समन्वय समितिचे कार्यकर्ते गोवारी शहीद स्मारक चौक तारसा रोड कन्हान येथे एकत्रित येऊन ११४ आदिवासी गोवारी शहीदाना श्रद्धांजली अर्पण करून नागपुर च्या मुक मोर्चात सहभागी होत १४ ऑगस्ट ला न्यायालयाने दिलेल्या न्यायाची अमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली .

आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समिती महाराष्ट्र अंतर्गत पारशिवनी तालुका प्रमुख आनंद सहारे व रामटेक तालुका प्रमुख रूपेशजी राऊत याच्या नेतृत्वात कन्हान येथुन नागपुर जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला . मा हाई कोर्ट मुम्बई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंड पिठाने दिलेल्या १४ ऑगस्ट २०१८ च्या निर्णयाची अमलबजावणी सरकारने त्वरित करून गोवारी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र दयावे अनुसुचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून गोवारी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली .

या मुक मोर्चात प्रामुख्याने आदिवासी गोवारी समाज संगठन महाराष्ट्र पारशिवनी तालुका अध्यक्ष नेवालालजी सहारे , शाखा कन्हानचे अध्यक्ष आनंद सहारे कान्द्रीचे श्री गेन्दलालजी बोपचे, भिमशक्ती प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी भिमटे, प्रशांतजी वाघमारे, भगवानजी सरोदे उपस्थित होते.या आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता गोवारी समाज बांधव-विनोद कोहळे , अर्विन्द किसन नेवारे, सेवक भोन्डे, दिलीप राऊत, रामदास वाघाडे,प्रकाश सोनवाने, शालिकराम राऊत, नारायण सोनवाने, वासुदेव कुसराम, प्रभाकर सोनवाने, नरेश कोहळे , विजेन्द्र वाघाडे, गोविन्द देव्हारे , विजय कुसराम आदीने परिश्रम घेतले. मुक मोर्चात पारशिवनी, रामटेक, मौदा तालुक्यातील मोठय़ा संख्येने समाज बांधव उपस्थितीत झाले होते .