Published On : Tue, Feb 6th, 2018

मेडिकलच्या डीन ने नागरिकांना ठरविले चोर; युवक काँग्रेसचे आंदोलन, डीन विरोधात पोलीस तक्रार

Advertisement


नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात व नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अनुसूचित जाती जमाती सेल चे उपाध्यक्ष सुनील जाधव,फजलूर कुरेशी, अक्षय हेटे, बंटी खरे, राकेश बैसवारे यांच्या नेतृत्वात टी.बी वार्ड समोर मेडिकल प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सोलर पॉवर प्रोजेक्ट च्या नावाने शासकीय मेडिकल कॉलेज टी.बी वार्ड परिसरातील लाखो रुपयांचे सागवान व सरकारी संपत्ती चोरीला गेली.

सोलर पॉवर प्रोजेक्ट मंजूर नसतांनी डीन च्या आशीर्वादाने विजय भांडारकर नावाचे गृहस्थ मेडिकल प्रशासनाच्या संपर्कात होते त्यांनी टी.बी वार्ड च्या मागील बंद पडलेल्या वार्डातील सागवनचे दरवाजे,लोखंडी खिडक्या अन्य सामान काढायला सुरुवात केली असता स्थानिक नागरिकांनी त्यांना विरोध केला व विचारले असता प्रोजेक्ट कंत्राटदाराने डीन च्या परवानगी ने सामान काढत आहो येथे सोलर पॉवर प्रोजेक्ट चे काम सुरू होणार आहे. नागपूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके म्हणाले आमचा प्रोजेक्टला विरोध नाही पण प्रोजेक्ट मंजूर झाला नसतांनाही विजय भांडारकर यांनी या सामानाची विल्हेवाट मेडिकल प्रशासनाच्या सहमतीने लावली.प्रशासनाला विचारले असता याबाबत काहीच माहीत नाही असे उत्तर दिले. प्रशासनाने स्थानिक नागरिकांवर आरोप लावला की सुरक्षा व्यवस्था नसल्या कारणाने स्थानिक नागरिक चोरी करतात व त्यांना चोर ठरविले स्थानिक नागरिकांनी म्हंटले की आम्हाला चोर ठरवून आमची बदनामी करीत आहे समाजात आमचे नाव खराब झाले तर लोक आमच्या कडे संशयाने पाहतील आमच्या पोरा-पोरींचे लग्न कसे जुळेल.हा आमचा अपमान आहे.स्वतःआमचा आरोप आहे की मेडिकल चे डीन व प्रोजेक्ट कंत्राटदार विजय भांडारकर यांची मिलीभगत आहे.


प्रोजेक्ट मंजूर नसताना प्रोजेक्ट चे काम कसे काय सुरू करण्यात आले यात कंत्राटदाराने टी.बी वार्डात आपले कार्यालय थाटले. स्वतःला भाजपच्या हेविवेट नेत्याच्या जवळचा आहे म्हणून वावरत असतो कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा.ली चा बोर्ड ही लावण्यात आला होता या सर्व बाबींचा उलगडा झाला पाहिजे. या बाबतीत स्थानिक नागरिकांच्या सोबत होऊन त्यांच्या स्वाक्षरी निश्या मेडिकल चे डीन अभिमन्यू निस्वाडे यांचा विरोधात इमामवाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली व कडक कारवाई ची मागणी करण्यात आली.


आंदोलनात नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष सुनील जाधव, फजलूर कुरेशी, अक्षय हेटे, बंटी खरे, राकेश बैसवारे,मिनाबाई राठोड, रत्नमाला बैसवारे, किशन रील, कुणाल टाकसोरे, चंदू तोमस्कर, दीपक कनोजिया, राकेश बैसवारे,रोहित खैरवार, अविनाश तोमस्कर,सोनू मोगरे, अजय राठोड, राजेश बैसवारे, राजेंद्र ठाकरे, शहाबाज खान चिस्ती, अक्षय घाटोळे, राहुल मोहोड,हेमंत कातुरे, सौरभ शेळके,फरदिन खान, विलास डांगे, नितीन सुरुशे, सागर चव्हाण, पंकेश निमजे, स्वप्नील ढोके, आशिष लोणारकर, बाबू खान, देवेंद्र तुमाने, पूजक मदने, नितीन गुरव, पंकज इजनकर इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.