| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 6th, 2018

  घटकाभर बसा आणि पोटभर हसा


  नागपूर: बोली भाषेचा लहजा, त्यातून निर्माण झालेले विनोद, नकलांची बरसात आणि या सर्व कॉमेडीवर पोटधरून हसणारे रसिक असे चित्र आज (ता.५) रेशीमबाग मैदानावर अनुभवायला मिळाले.

  निमित्त होते नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित विदर्भस्तरीय महिला उद्योजिका मेळाव्यात दुस-या दिवशी सादर झालेल्या “घटकाभर बसा आणि पोटभर हसा” या कार्यक्रमाचे. महिला उद्योजिका मेळाव्याच्या आजच्या दुस-या दिवशी राजेश चिटणवीस प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. उपमहापौर दीपराज पार्डीकर हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी होते. महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, उपायुक्त डॉ. रंजना लाडे यावेळी मंचावर उपस्थित होते. सभापती वर्षा ठाकरे यांनी शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन उपमहापौर पार्डीकर यांचे स्वागत केले. नकलाकार राजेश चिटणवीस यांचा सत्कार उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विनोदाच्या दणक्यात कार्यक्रमाला सुरूवात झाली. राजेश चिटणवीस यांनी आपल्या अफलातून नकलांनी रसिकांना पोटभर हसवले. अमोल एदलाबादकर यांनी स्टॅंड अप कॉमेडीने रसिकांना खिळवून ठेवले. गाण्यातून, दैनंदिन बोलण्यातून निर्माण होणारे विनोद, मिमिक्री आदीवर रसिकांनी भरभरून दाद दिली.

  वैभव नदाने, आकाश दुधनकर यांनीही कार्यक्रमात रंगत आणली. संपूर्ण कार्यक्रमाला सीमा गोडबोले यांनी आपल्या निवेदनातून एकसूत्रात बांधले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145