Published On : Wed, Dec 26th, 2018

सिमेंट ट्रेलर ट्रक व दुचाकी अपघातात युवकांचा मुत्यु

कन्हान: नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील बोरडा रोड चौक कांद्री टोल नाकाजवळ सिमेंट ट्रेलर ट्रक व दुचाकी अपघातात अमर शिंगणे या युवकांचा मुत्यु झाला .

प्राप्त माहीती नुसार सोमवार (दि.२४) ला रात्री ९.३० वाजता दरम्यान न्यु गोंडेगाव येथील युवक अमर मोरेश्वर शिंगणे वय २८ वर्ष हा आपल्या दुचाकी क्र एम एच ४० ए डी ९९३६ ने कन्हान वरून घरी परत जाताना कांद्री शिवारात नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील बोरडा रोड चौक कांद्री टोल नाकाजवळ नादुरूस्त उभा सिमेंट ट्रेलर ट्रक एम एच ४० – ६२५२ व दुचाकी चा अपघात झाला .

Advertisement

यात दुचाकी चालक अमर शिंगणे गंभीर जखमी झाल्याने मेडिकल नागपुर येथे दाखल करण्यात आले असता उपचार दरम्यान रात्री ३ वाजता त्याचा मुत्यु झाला . चारपदरी महामार्गावर नादुरूस्त ट्रेलर ट्रक चालकांने कुठलेही सुरक्षेचे उपाय न केल्याने रात्री अंधारात ट्रेलर ट्रक न दि दिसल्याने झालेल्या अपघातात युवकांचा मुत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी सिमेंट ट्रेलर ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास पो उप निरिक्षक प्रल्हाद धवड करित आहेत.

मंगळवार (दि. २५) ला दुपारी ३ वाजता न्यु गोंडेगाव बोरडा रोड येथुन अमर शिंगणे याची अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement