Published On : Wed, Dec 26th, 2018

वोक्हार्टच्या ह्रदयरोग तज्ज्ञांनी सर्वात छोट्या पेसमेकरचे रोपण

विदर्भातील आणि मध्य भारतातील पहिलेच रोपण

नागपूर: वोक्हार्ट हॉस्पिटल येथील वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञांना सर्वात छोट्या पेसमेकरचे रोपण करण्यात यश आले आहे. मध्य भारतातील आणि विदर्भातील सर्वात छोट्या पेसमेकरचे हे पहिलेच रोपण आहे. मध्य प्रदेश येथील 82 वर्षीय रुग्णाच्या हृदयाला या पेसमेकरचे रोपण करण्यात आले. जगण्याचा कुठलाही पर्याय नसलेल्या व्यक्तीसाठी ही प्रक्रिया जीवनदायी म्हणून सिद्ध झाली आहे. या रोपणासाठी हृदयरोग तज्ज्ञांचे तांत्रिक सहकार्य (टेक्निकल एक्पर्टाईज) तसेच एक तज्ज्ञांची चमू आवश्यक आहे. या पेसमेकरच्या रोपणामुळे मध्य भारतातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या वैद्यकीय यशाच्या यादीत आणखी एक नाव कोरल्या गेले आहे.

82 वर्षीय गृहस्थ गेल्या काही महिन्यांपासून हृदयविकाराच्या आजाराने ग्रसले होते आणि हृदय सुरुच ठेवण्यासाठी तातडीने पेसमेकर रोपण करण्याची आवश्यकता होती. त्यांच्या मध्य प्रदेशामधील स्थानिक डॉक्टरांनी पारंपारिक पद्धतीने म्हणजे डाव्या बाजूला छिद्र करून, तेथे एक पिशवी तयार करून पेसमेकरचे रोपण केले. काही दिवसातच त्या ठिकाणी संसर्ग होऊन पस होऊ लागला. त्यामुळे डाव्या बाजूचा पेसमेकर काढण्यात आला व त्याचे उजव्या बाजूला रोपण करण्यात आले. अगदी महिन्याभराच्या कालावधीतच उजव्या बाजूलाही संसर्ग झाला.


त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक वोक्हार्ट हॉस्पिटलचे वरिष्ठ ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन तिवारी यांना भेटले. त्यांनी तातडीने लीडलेस पेसमेकर (एमआयसीआरए) रोपण करण्याचा सल्ला दिला. या पेसमेकरच्या रोपणासाठी स्किन पॉकीटची आवश्यकता नसते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका संभवत नाही. एमआयसीआरए (मायक्रा) हे जगातील सर्वात छोटे पेसमेकर असून थेट हृदयाला लावता येते. पारंपारिक पेसकरच्या तुलनेने हे 93 टक्क्यांनी छोटे असते. त्याचे वजन केवळ 1.75 ग्राम आणि आकारमान 0.8 सीसी एवढा असतो.

पारंपारिक पेसमेकर रोपण करण्यासाठी हृदयापाशी एक कृत्रिम खिसा तयार करावा लागतो. (खालील चित्रांमध्ये दाखविण्यात आला आहे) आणि त्याम्ध्ये छोटी धातूच्या पात्रात एक बॅटरी व हृदयाकडे इलेक्ट्रिकल पल्स पाठवून हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी इलेक्ट्रिकल सर्किट असते. एक ते तीन लवचिक, उष्णतारोधक वायर प्रत्येक हृदयाच्या प्रत्येक चेंबर पर्यंत पोहचविण्यात येतात त्यातून हृदयाची गती नियंत्रित करता येते.

डॉ. तिवारी म्हणाले की, ‘पारंपारिक पेसमेकरमुळे पॉकेटच्या ठिकाणी संदर्ग होण्याचा धोका 1.6 टक्के ते 2.2 टक्क्यांपर्यंत असते. जेव्हा पेसमेकर रोपणाची दुसरी वेळ असते तेव्हा तेव्हा अधिक धोका संभवतो. मधूमेहग्रस्त रुग्ण, युवा पुरुष, एकाहून अधिक पेसमेकर रोपण झालेले रुग्ण आदी रुग्णांना संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो. शिवाय कमी संख्येत पेसमेकर रोपण केले तर संसर्गाचा धोका कमी असतो असे डॉ. तिवारी यांनी स्पष्ट केले. जर स्वच्छा संबंधीची काळजी, मधूमेहावर योग्य ते उपचार आणि शस्त्रक्रियेपूर्वीचे प्रतिजैविक योग्य पद्धतीने घेतल्यास संसर्ग टाळता येतो.

वोक्हार्टबद्दल
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, टर्शरी केअर सुपर स्पेशालिटी रुग्णालय शृंखला असून गोवा, नागपूर, नाशिक, वाशी(नवी मुंबई), राजकोट, सुरत, मीरा रोड आणि दक्षिण मुंबई येथे सुविधा उपलब्ध आहे. सर्व वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि रुग्ण सेवा व सुरक्षितता सक्षम करण्यासाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रक्रिया त्यांच्याकडे आहेत. वोक्हार्ट हॉस्पिटल्स लिमिटेड, व्यावसायिकरीत्या व्यवस्थापित असे देशातील एक कार्पोरेट हॉस्पिटल रुग्णालय समुह असून तिथे रुग्णाची सुरक्षितता आणि सेवा गुणवत्ता हे गाभा-धोरण आहे. एकूण 1600 पलंग असलेल्या या रुग्णालयांमध्ये नैदानिक आणि गैर-नैदानिक प्रक्रियांसाठी 1000 वर मानक कार्यान्वयन प्रक्रिया किंवा प्रोटोकॉल आहेत. रुग्ण सेवा आणि रुग्णांची जीवन गुणवत्ता समृद्ध करणे हे मार्गदर्शक तत्त्व आहे.