Published On : Wed, Dec 26th, 2018

अखेर दिल्ली च्या बैठकीत ६८२/00 किमी वर टोल शिफ्ट करण्याबाबत शिक्कामोर्तब

Advertisement

आमदार रेड्डी यांचे प्रयत्नांना यश

रामटेक : रोजी मनसर येथील टेंपररी टोल शिफ्ट करण्याबाबत ट्रांसपोर्ट भवन, नवी दिल्ली येथे मा. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. स्थानिक आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे सतत सुरू असलेल्या पाठपुरावा व प्रयत्नातुन मनसर येथील टोल किमी ६८२/०० वर शिफ्ट करण्याकरिता आज शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिली.या बैठकीमध्ये नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, ट्रांसपोर्ट मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी युधवीर सिंह, एनएचएआई चेयरमैन मलिक, टेक्निकल डायरेक्टर तावडे, क्षेत्रीय अधिकारी चंद्रशेखर, प्रकल्प संचालक येवतकर, विकास तोतडे उपस्थित होते.

मनसर येथील टेंपरेरी टोल शिफ्ट करण्याकरिता वारंवार आंदोलने करण्यात आली. शेवटी या आंदोलनाला यश प्राप्त झाले. सर्वे नगरसेवक, सरपंच, पदाधिकारी ,कार्यकर्ते, नागरिक व मनसर टोल हटाओ कृती समितीचे संयोजक विशाल कामदार, नरेंद्र बंधाटे ,परमानंद शेंडे, हेमराज चोखान्द्रे , यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आमदार मल्लिकार्जुनजी रेड्डी यांचे खूप खूप आभार मानले. टोल शिफ्टिंग चा बैठकीत निर्णय झाला हा मॅसेज रामटेक ला येताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.टोल शिफ्टिंग वर शिक्कामोर्तब झाले ही माहिती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली काहींना तर विश्वासच वाटत नव्हता. फटाके फोडून भारतीय जनता युवा मोर्चा अतुल हजारे महामंत्री युवा मोर्चा राहुल किरपान ,महेंद्र साबरे,राजू शेंदरे,सतीश डोंगरे,रजत गजभिये,नंदकिशोर चदनखेडे ,रानू शाही,संदीप कभे, व इतर शेकडो युवा मोर्चा कार्यकर्ते यांनी आनंद द्विगुणित केला.

-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील मनसर येथील टेम्पररी टोल बुथ हटविण्यात यावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अनेक आंदोलने व मोर्चे काढण्यात आली आणि रामटेक परिसरातील तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व वर्गातील जनतेसाठी आणि विशेषतः रामटेक दर्शन व परिसरातील पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा आर्थिक भुरदण्ड या टोलच्या रूपाने भरावा लागत आहे आणि त्याचमुळे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने यासाठी केल्या गेली आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सातत्याने हा मुद्दा जोरदार पणे लावून धरला .

टोल शिफ्टिंग करीता नुकतेच 21 डिसेंबर पासून नगरसेवक,सरपंच,पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह साखळी उपोषणवर देखील बसलेे. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल ६८२/०० किमी वर टोल शिफ्ट करण्याबाबत शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी दिली .