Published On : Mon, Mar 30th, 2020

कोरोना संचारबंदीत विविध छंद आवड सह संगीत , कैरम चा आधार

Advertisement

रामटेक :- संपुर्ण जगात आज कोरोनाचे सावट असून या जागतिक महामारीच्या संसर्गजन्य रोगाने सर्वत्र थैमान मांडले आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणून प्रशासनाने संपुर्ण देशात लाॅकडाऊन व संचारबंदी लागू केलेली आहे.या परिस्थितीत या काळात दिवस घरात कसा घालवावा. लहानांना घरातच कसे थांबवून ठेवता येईल असा यक्षप्रश्न आहे.

या परिस्थितीत विरंगुळा म्हणून एरव्ही अडगळीत ठेवलेला कॅरम बोर्ड, बुदधीबळ,ताशपत्ते,चौ अष्टा यासारखे खेळांचा आधार असून काही घरात अंताक्षरी सारखे उपक्रम होतात.कुठे कुठे आवडीनुसार चित्रपट बघणे,मोबाईलवरील खेळात कुटुंब रंगतात अशातच रामटेक परिसरात तबलावादक म्हणून प्रसिद्ध असलेले कलावंत शिक्षक प्रशांत जांभुळकर यांच्या घरात विविध वाद्यवादन ,गायन या संगीतमय वातावरणात कौटुंबिक मनोरंजनातून आनंद निर्मिती केली जाते. यांत पियूष, वेदांतसह वैष्णवी सहभागी होत असते. इतर वेळेस कोरोना रोगावरील जनजागृतीमय गीत बाल कवितांच्या रचना व लेखनाचा छंद व आवड जपत असल्याचे प्रशांत जांभुळकर सांगतात. सायंकाळी घराच्या अंगणात छतावर बॅडमिंटन खेळ व इतर पारंपारिक खेळ खेळल्या जातात महत्वाचे म्हणचे या खेळात संपुर्ण कुटुंब सहभाग घेतात जयंत देशपांडे,सुनील पांडे,राकेश मर्जिवे ,सतीश पुंड,विकास गणवीर ,हलमारेसर,संजय,किशोर लेंडे ,डाॅ महाजन ,माकडे परिवार , येरपुडे, ढोमने, अविनाश शेंडे, पारिवारिक आनंदात खेळात सहभाग घेत असल्याचे चित्र अनुभवास आले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घरातील गृहिणी महिला आपले उन्हाळ्यातील,पापड,वड्या,शेवया व इतर खाद्य पदार्थ बनवून वेळ घालवतात तर घरातील वृद्ध मंडळी टिव्हीवरील धार्मिक व कौटुंबिक धारावाहिक व चित्रपटांचा आधार घेतात.दुरदर्शनवर रामायण महाभारत सर्कस जंगलबुक सारख्या धारावाहिक सुरू आहेत.बच्चे कंपनी कार्टुन्स सह मोबाईलवरील खेळात रममान होतात. सायंकाळी एक बदल म्हणून बॅडमिंटन,क्रिकेटही घरच्या मोठ्यामंडळीसोबत खेळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते.मोठ्या कुटुंबात नातवांना आजी आजोबांची गोष्ट सांगणे व खेळण्यात मदत होते तर छोट्या कुटुंबात लहान मंडळींना सांभाळतांना पालकांची तारांबळ उडत असल्याचे दिसते.

एकंदरीत या कोरोनाच्या सावटात दैनंदिन दिनचर्येत बदल झाला असून घरातील लहांनांसह मोठेही घरातच राहात असल्याने कौटुंबिक संवाद उत्तम प्रकारे साधल्या जातो.दररोज वेगवेगळे खाद्य पदार्थ घरात तयार होतात. धुणी भांडी मोलकरणींना सक्तीची सुटी दिल्याने घरातल्या महिलांची थोडी धावपळ होत असल्याचेही जाणवते .प्रत्येकांनी आपआपली आवड, छंद जोपासून घरातच थांबून कोरोनाशी लढून त्याला नामोहरम करून या भयंकर रोगाला हद्दपार करणे व प्रशासनाला सहकार्य करण्याची आज खरी आवश्यकता आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement