Published On : Mon, Mar 30th, 2020

नदी स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे

Advertisement

मनपाचे आवाहन : येत्या काही दिवसात पिवळी व पोरा नदीची स्वच्छता

नागपूर : नदी स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली आहे. सद्या नाग नदी स्वच्छतेचे कार्य सुरू असून लवकरच पिवळी व पोरा नदीची स्वच्छता केली जाणार आहे. नदी स्वच्छता अभियानाला सहकार्य म्हणून स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे व शक्य ती मदत करावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील ‘लॉकडाऊन’चा फायदा घेत पहिल्यांदाच मार्च महिन्यात नदी स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाची सोमवारी (ता.३०) मनपाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी पाहणी केली. याप्रसंगी जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, अभियानाचे प्रमुख तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मोहम्मद इसराइल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


पावसाळ्यात नदी काठावरील घरांना संभावणारे धोके लक्षात घेता दरवर्षी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. पावसाळ्याच्या तोंडावर हे अभियान सुरू केल्याने संपूर्ण नदी स्वच्छतेत अनेक अडथळे उद्भवतात. हा धोका लक्षात घेता यावर्षी ‘लॉकडाऊन’चा फायदा घेत मार्च महिन्यातच नदी स्वच्छता अभियान सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला. त्यानुसार नाग नदीचे स्वच्छता कार्य सुरू आहे. पुढील टप्प्यात पिवळी नदी व पोरा नदीची स्वच्छता केली जाणार आहे. नदी स्वच्छतेसाठी पोकलेन, टिप्पर अशा साहित्यांची आवश्यकता लागते. याशिवाय नदीतील गाळ वाहण्यासाठी इतर वाहनांची गरज आहे. नदी स्वच्छता कार्यात सहकार्य म्हणून शहरातील स्वयंसेवी संस्थांनी आवश्यक साहित्य वा अन्य स्वरूपातील मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महानगरपालिकेचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी केले आहे.

नदीमधून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा केला जाणार आहे. हा गाळ उद्यानांमध्ये उपयोगात आणला जाईल. याशिवाय ज्या स्वयंसेवी संस्थांकडून मागणी केली जाईल, त्यांनाही उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या शहरातील नद्या ही आपली संपत्ती आहे. त्यामुळे या नद्या स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. नदी काठावरील तसेच अन्य नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखावी व नदीत कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये, असे आवाहनही अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement