Published On : Mon, Mar 30th, 2020

कोव्हीड 19 या विषाणूमुळे पसरणाऱ्या साथीच्या पार्श्वभूमी वर हँड सिनिटाइझर चे नागपूर मध्ये उत्पादन – अधीक्षक प्रमोद सोनोने

नागपूर : कोव्हीड 19 या विषाणू मुळे पसरणाऱ्या साथीच्या पार्श्वभूमी वर हँड सिनिटाइझरच्या उत्पादनास प्रोत्साहन देणे बाबत आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई – कांतीलाल उमाप यांनी कळविले वरुन नागपूर डिस्ट्रीलरीचे डायरेक्टर जगन्नाथ सिंग सेठी टेका नाका नागपूर या मदय उत्पादक युनीट ने हँड सिनिटाइझर बनवून देण्यास तयार असल्याचे कळवून विनंती केली.

त्या नुसार सर्व मदय उत्पादकांचे सहयोगाने अन्न व औषध विभागा कडून अर्जदारांना हँड सँनिटायजर चे उत्पादन करण्यासाठी लायसन्स देण्यात आले व जिल्हाधिकारी नागपूर हयांनी सँनिटायजर उत्पादन करण्यासाठी कंपनी उघडण्यासाठी परवानगी दिली.

Advertisement

आज WHO च्या मापदंडा नुसार हँड सँनिटायजर बनवून पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. या कामी जिल्ह्याधिकारी नागपूर रवींद्र ठाकरे व विभागीय उपायुक्त मोहन वर्दे तसेच अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रमोद सोनोने तसेच FDI व पोलीस विभागाने सहकार्य केले तसेच घटकांचे प्रभारी अधिकारी सूरज कुसले व क्षेत्रीय अधिकारी निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी उत्पादन सुरु होण्यास मदत केली.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement