Published On : Mon, Mar 8th, 2021

प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान अतुलनीय : डॉ. दीक्षित

महा मेट्रोत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

नागपूर आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान अतुलनीय असून सर्व ठिकाणी महिला बरोबरीने आपले कर्तव्य पार पाडत आहे असे गौरवपूर्ण उद्दगार महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्याने महा मेट्रो येथे आयोजित छोटेखानी समारंभात महिला कर्मचाऱ्याना संबोधित करित होते.

महा मेट्रोच्या नागपूर आणि पुणे मेट्रो रेल प्रकल्पामध्ये कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी मिळून यशस्वीपणे कार्य पार पाडत असून मेट्रो रेल प्रकल्पाचे कार्य गतीने सुरु आहे. खूप ठिकाणी महिला कार्य करू शकत असून आपल्या कामाचा ठसा महिला उमटवीत आहे. या सर्वाच्या कार्यामुळेच महा मेट्रो प्रगती करीत आहे. महिला म्हणून बरेच योगदान समाजासाठी, देशासाठी,शहराकरिता आणि नागरिकान करिता करायचे आहे. एक काळ असा देखील होता ज्यावेळेस महिलांना मतदानाचे अधिकार देखील नव्हते परंतु समाज आता पुढे आला आला असून सकारात्मक बदल घडत आहे. आपण कुणापेक्षाही कमी नाही या जिद्दीने कार्य करण्याचे आवाहन डॉ. दीक्षित यांनी महिला कर्मचाऱ्याना केले.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पामध्ये प्रशासकीय भवन व्यतिरिक्त नागपूर मेट्रोचे संचालन कार्याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहे ज्यामध्ये मेट्रो ट्रेन ऑपरेटर,स्टेशन फॅसिलिटी स्टाफ,तिकीट ऑपरेटर,कस्टमर फॅसिलिटी असिस्टंट्, स्टेशन कंट्रोलर, हाऊसकिपींग, महिला सुरक्षा रक्षक याचा समावेश आहे. सुमारे ३०% महिला महा मेट्रो येथे कार्यरत असल्याचे डॉ. दीक्षित यांनी यावेळी नमूद केले. मेट्रो भवन येथे आयोजित कार्यक्रमात महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित सपत्नीक उपस्थित राहून मेट्रोत कार्यरत कर्मचाऱ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच, त्यांच्या कार्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.यावेळी संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) श्री. सुनील माथुर, संचालक (वित्त) श्री.एस शिवमाथन तसेच इतर अधिकारी सपत्नीक उपस्थित होते.

आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात सेनगुप्ता हॉस्पिटलच्या संचालिका व गाइनˈकॉलजिस्ट् श्रीमती. राजसी सेनगुप्ता,आयरन मॅन २०२० श्रीमती. सुनीता धोटे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्यक महाव्यवस्थापक(वित्त) श्रीमती श्वेताली ठाकरे यांनी केले.