Published On : Wed, Sep 25th, 2019

कांग्रेसच्या पाणीपतला कांग्रेसची गटबाजीच जवाबदार

– कामठी विधानसभा मतदार संघात 1995 पासून कांग्रेस ला प्रतिनिधित्व नाही

कामठी :-कामठी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार यादवराव भोयर यांचे मागच्या वर्षी दुःखद निधन झाले .दिवंगत झालेले कांग्रेस चे माजी आमदार यादवराव भोयर यांनी सन 1985 ते 1995 पर्यंत चा दोन पंचवार्षिक कामठी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले मात्र त्यानंतर म्हणजेच 1995 पासून हा मतदार संघ कांग्रेस च्या प्रतिनिधित्व पासून दूर राहिलेला आहे. यामतदार संघाची हट्रिक करून चौकार मारण्याच्या बेतात असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे चा पराभव करणे हे एक आव्हान ठरले असून याला जवाबदार कांग्रेस ची गटबाजी मानली जाते तर आजच्या स्थितीत कांग्रेस चे पानिपत झालेले स्थितीला कांग्रेसची गटबाजी च जवाबदार आहे.

Advertisement

सन 1962मध्ये कामठी विधानसभा मतदार संघाची स्थापना झाली असून मागील सहा दशकांचा विचार केल्यास सन 1962 मध्ये कामठी विधानसभा निवडणुकीत कांग्रेस चे अनंतराम चौधरी यांनी 20 हजार 36 मते घेऊन विजय मिळवीत प्रतिस्पर्धी असलेले रिप्लब्लिकन पक्षाचे कालचंद्र सोनटक्के यांचा 5 हजार 50 मतांनी पराभव करून कांग्रेस पक्षाचा खाता उघडला होता.सन 1967 मध्ये कांग्रेस पक्षाकडून सुलेमान खान पठाण यांनी 22 हजार 154 मते घेऊन रिपब्लिकन पक्षाचे कामगार नेते ऍड नारायण हरी कुंभारे यांचा 7 हजार 182 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता.सन 1972 मध्ये कांग्रेस चे सुलेमान खान पठाण यांनी रिपब्लिकन पार्टी (खोब्रागडे गट)चे रामदास विठोबा मेश्राम यांचा 15 हजार 594 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता.सन 1978 मध्ये कांग्रेस चे तेजराव सिंह भोसले यांनी रिपब्लिकन पार्टी (खोब्रागडे गट)चे डॉ रजनी रॉय यांचा 25 हजार 491मतांनी पराभव करून विजय मिळविला होता .सन 1980 मध्ये कांग्रेस चे सुरेशबाबू देवतळे यांनी युनायटेड कांग्रेस चे डॉ मोहम्मद कुरेशी यांचा 19 हजार 227 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता.

सन 1985 मध्ये कांग्रेस चे यादवराव भोयर यांनी रिपब्लिकन पार्टी चे ऍड संपत रामटेके यांचा 32 हजार 74 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता.तर सन 1990 मध्ये परत यादवराव भोयर यांनी कांग्रेस पक्षातून उमेदवारी घेत कांग्रेस चे बंडखोर विद्यमान जी प उपाध्यक्ष देवराव रडके यांचा अवघ्या 599 मतांनी निसटता पराभव करीत विजय मिळविला होता.सन 1995 मध्ये परत कांग्रेस पक्षातून यादवराव भोयर यांनी निवडणूक रिंगणात उडी मारून हट्रिक करण्याच्या बेतात होते मात्र कांग्रेस च्या अंतर्गत गटबाजी नेत्यांनी यादवराव भोयर यांचा विरोध करीत कांग्रेस चे बंडखोर देवराव रडके यांना अपक्ष रिंगणात उतरवून छुप्या पद्ध्तीने चांनक्षय पद्धतीचा वापर करून ‘घंटा’या निवडणूक चिन्हा वर उभे असलेले देवराव रडके यांनी 59 हजार 738 मते घेऊन कांग्रेस चे उमेदवार यादवराव भोयर यांचा 22 हजार 801 मतांनी दारुण पराभव केला होता.तेव्हापासूनच कांग्रेस च्या गटबाजीला उधाण आले.1999 मध्ये रिपब्लिकन कांग्रेस पक्षाची आघाडी होऊन ऍड सुलेखाताई कुंभारे यांना उमेदवारी मिळाली होती यावेळी ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी भाजप सेना युतीचे उमेदवार मनोहर आखरे यांचा अवघ्या 5226 मतांनी पराभव करीत विजय मिळविला होता.

2004 मध्ये रिपब्लिकन कांग्रेस आघाडी कडून विद्यमान राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांना पुनःश्च निवडणूक रिंगणात उतरविले यावेळी यांच्या विरोधात भाजप सेना युतीकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळाली दरम्यान कांग्रेसचा काही कार्यकर्त्यांनी नागपूर जी प चे विद्यमान सभापती पुरुषोत्तम शहाणे यांना बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले दरम्यान पुरुषोत्तम शहाणे यांना 26 हजार मते मिळाले तर विजयश्री झालेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या ऍड सुलेखाताई कुंभारे यांचा 7 हजार 394 मतांनी पराभव करून विजय मिळविला , 2009 मध्ये भाजप सेना युतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे पुनश्च निवडणूक रिंगनात उतरले यावेळी कांग्रेस कडून सुनीता गावंडे यांचा 31 हजार 93मतांनी दारुण पराभव केला .यावेळी बावनकुळे यांना 95 हजार 80 मते मिळाली होती.सन 2014 मध्ये भाजप सेना युतीचे उमेदवार चंद्राशेखर बावनकुळे यांनी विजयाचि हट्रिक करीत प्रतिस्पर्धी असलेले कांग्रेस चे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचा 40 हजार 2मतांनी पराभव केला होता.

या सर्व बाबीचा विचार केला असता निवडणुकीच्या वेळी पक्षश्रेष्ठी कडून देण्यात येणारी उमेदवारी तिकीट हे पक्षातील काही पदाधिकारी कार्यकर्त्यांना पटण्यासारखे नसल्याने अप्रत्यक्ष रित्या बंड पुकारीत गटबाजी कायम ठेवुन घरात राहूनच घरातील सदस्यांचा घात करीत असल्याने ‘घर का भेदी लंका ढाये’ही स्थिती कायम असून स्थानिक उमेद्वराला वगळून बाहेरचा पार्सल या विधानसभा मतदार संघात उतरवत असल्याने स्थानिक उमेदवाराला वाव मिळत नाही तसेच येथील गटबाजी मुळे च कधी अस्तित्वहीन असलेला कमळ या मतदारसंघात उगवला असून या चिन्हवरील उमेदवाराने हट्रिक मारून चौफेर मारण्याचा दावा करीत आहे तेव्हा कांग्रेस आता तरी गटबाजी बाजूला सारून एकनिष्ठ कायम राखत कांग्रेस चा पंजा उगवेल का?1995 पासून प्रतिनिधींत्वहीन राहलेला कांग्रेस च्या उमेदवाराला संधी मिळणार का?याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे
– संदीप कांबळे, कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement