Published On : Wed, Sep 25th, 2019

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी…….

Advertisement

– इच्छुक उमेदवारीच्या प्रतिक्षेतच;कुणाची दिवाळी अन कुणाचे दिवाळे

कामठी :-संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा बीगुल वाजला असून दिवाळी आधी निवडणूक निकालाचे फटाके फुटणार आहेत यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मानल्या जाणाऱ्या कामठी विधानसभा क्षेत्रातील आव्हानात्मक ठरलेले भाजप चे उमेदवार पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात कांग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त आघाडीतील कांग्रेस चे उमेदवार जाहीर झाले नसून इतर प्रमुख राजकीय पक्षाने सुद्धा उमेदवारांची यादी जाहीर झाली नसल्याने इच्छुक अजूनपावेतो प्रतिक्षेतच असुन कुणाची दिवाळी होणार अन कुणाची दिवाळे निघणार याकडे विधानसभा क्षेत्रातील समस्त वासीयांचे लक्ष वेधले असून मतदारांची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे.

कामठी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे.4 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 5 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे तर 7 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे व 21 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया होणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी अँती निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.यानुसार कामठी विधानसभा क्षेत्रात 494 मतदान केंद्र असून कामठी मौदा व नागपूर ग्रामीण मिळून एकूण 4 लक्ष 38 हजार 417 मतदार आहेत. मागील 2014 च्या विधानसभा निवडणूक निकाल लक्षात घेता या विधानसभा क्षेत्रात हेट्रिक करीत 1 लक्ष 26 हजार 755 मते घेत विजय मिळविला होता तर प्रतिस्पर्धी असलेले कांग्रेस चे उमेदवार राजेंद्र मुळक हे स्थानिक नसूनही ऐन वेळी पक्षाने दिलेल्या तिकिटांचा मान करीत अवघ्या 13 दिवसात मिळालेल्या निवडणूक प्रचारातुन तब्बल 86 हजार 753 मते घेऊन पराभूत झाले होते.

आजच्या स्थितीत भाजप चे चंद्रशेखर बावनकुळे हे या कामठी विधानसभा निवडणुकीत चौकार मारीत ‘अब के बार एक लाख पार’या विश्वासाने निवडणूक रिंगणात उतरणार आहेत अश्या स्थितीत मागिल 29 वर्षांपासून या क्षेत्रात कांग्रेस चा उमेदवार निवडून येऊ शकला नाही हे खूप मोठे दुर्दैव च म्हणावे लागेल तेव्हा या निवडणुकीत कांग्रेस चा उमेदवार निवडून आणण्यासाठी कांग्रेस व्युव्हरचना आखत असली तरी स्थानिक उमेदवाराला देण्यात येणारी तिकीट अजूनही जाहीर करण्यात आली त्याचप्रमाणे कोणत्याच राजकीय पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलीनाही त्यामुळे इच्छुक उमेदवार केवळ प्रतीक्षेत असून आपणासाच उमेदवारी मिळविण्यासाठी पक्ष श्रेष्ठीकडे धाव घेत देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत.

यानुसार भाजप कडून चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे तर यांच्या विरोधात कांग्रेस चे कित्येक दिग्गजांनि दिल्ली वारी करून उमेदवारी तिकिटांची इच्छा दर्शविली दरम्यान माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, माजी जी प सदस्य नाना कंभाले , कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती हुकूमचंद आमधरे यांच्या नावाची चर्चा रंगत आहे तसेच माजी आमदार आशिष देशमुख यांच्या नावाचो सुद्धा वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे तसेच बसपा कडून किशोर गेडाम, गणेश पाटील यासह अन्य नेत्यांनी इच्छाशक्ती दर्शविली आहे तसेच वंचित बहुजन आघाडी कडून प्रदीप मानमोडे, एम आयएम चे शकीबुर रहमान यांच्याही नावाची चर्चा आहे, तसेच इतर राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब अजमावणार आहेत यामध्ये बसपा चा उमेदवार मो अर्शद मागिल निवडणुकीत ऐन वेळी भूमिगत झाल्याने निवडणूक रिंगणात राहू शकला नाही तसेच मागिल नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेश दुबे यांनी ऐन वेळी उमेदवारी माघार घेतल्याने न प निवडणुकीत सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी बसपा चा उमेदवार राहू शकला नव्हता परिणामी या निवडणुकीत बसपा चा उमेदवार पूर्ववत घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती तर करणार नाही ना यासाठी योग्य चाचपनी करीतच उमेदवारी तिकीट देणार आहेत.तूर्तास कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस आघाडी या पक्षातील कुण्या इच्छुकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते अन कुणाची दिवाळी होते तसेच उमेदवारी मिळण्याचे स्वप्न भंगून कुणाचे दिवाळे निघते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत.

– संदीप कांबळे, कामठी