Published On : Fri, Mar 23rd, 2018

रेल्वेस्थानकावरील स्वच्छता आठ तास थांबली

नागपूर: घाम गाळून रेल्वे स्थानकाची स्वच्छता केली, त्यामुळे कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे, अशी किमान त्या कामगारांची अपेक्षा आहे. कंत्राटदाराने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे अर्धपोट उपाशी राहून रेल्वेस्थानकाची स्वच्छत करणे शक्य नाही, असे जाहिर करीत कामगारांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन केले. सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत रेल्वेस्थानकाची स्वच्छताच झाली नाही. सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांना नाकावर फडके बांधावे लागले. अधिकाºयांनी पुन्हा वेतन मिळण्याची हमी दिल्यामुळे दुपारी २ वाजता सर्व कामगार कामाला लागले.

मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाची स्वच्छता करणाºया सफाई कामगारांना मागील अडीच महिण्यांपासून वेतनच मिळाले नाही. त्यामुळे अर्धपोटीउपाशी राहून रेल्वे स्थानकाची स्वच्छता करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. जुन्या कंत्राटदाराने दिड महिण्याचे तर नव्या कंत्राटदाराने चालु महिण्याचे वेतन दिले नाही. त्यामुळे सफाई कर्मचारी अडचनीत आले आहेत. दरम्यान सफाई कामगारांना पुढील आठवड्यात त्यांचे रखडलेले वेतन देण्यात येईल, ही रक्कम संंबधीत कंत्राटदाराच्या अनामत रकमेमधून वसूल करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाºयाने आश्वासन दिले होते. तसेच कंत्राटदाराने २२ मार्चपर्यंत वेतन करण्याचे आश्वान कामगारांना दिले होते. २२ पर्यंत कामगारांनी प्रतीक्षा केली.

शुक्रवारी २३ मार्च उजाडताच सकाळच्या शिफ्टमधील कामगारांनी कामावर येताच कामबंद आंदोलन पुकारले. रेल्वे स्थानकावरील आरोग्य अधिकाºयाच्या कार्यालयासमोर सर्व कामगार एकत्रित झाले. दरम्यान रेल्वे स्थानकावर कचरा वाढतच गेला. दुर्गंधी पसरली अखेर आश्वासन मिळताच दुपारच्या शिफ्टमध्ये येणाºया कामगारांनी कामाला सुरुवात केली. यापूर्वी बुधवारी कमी करण्यात आलेल्या कामगारांना कामावर घ्या या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.