Published On : Fri, May 26th, 2023

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त केंद्र सरकार ७५ रुपयांचे नाणे करणार जारी

Advertisement

नवी दिल्ली : येत्या २८ मे रोजी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त 75 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले जाईल. मंत्रालयाने नाणे कायदा, 2011 च्या कलम 24 अंतर्गत राजपत्र अधिसूचना जारी केली.

नाण्यांचे संकलन आणि अभ्यास करणारे प्रसिद्ध नाणीशास्त्रज्ञ सुधीर लुणावत यांच्या मते, या 75 रुपयांच्या नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभाखाली 75 रुपये आणि उजवीकडे आणि डावीकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये भारत लिहिलेले असेल. नाण्याच्या दुसर्‍या बाजूला नवीन संसद भवनाचे चित्र असेल, ज्यावर हिंदीत आणि खाली संसद परिसर असे लिहिलेले असेल.

संसदेच्या चित्राच्या खाली 2023 हे वर्ष लिहिले जाणार आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नाण्याचे अनावरण करण्यात येईल. सुधीर यांनी सांगितले की, हे नाणे भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीने बनवले आहे. या नाण्याचे एकूण वजन 35 ग्रॅम आहे, ज्यामध्ये 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5-5 टक्के निकेल आणि झिंकचा समावेश आहे.