Published On : Fri, May 26th, 2023

नागपुरात ऑटोत बसलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने लंपास

नागपूर : शहरात चोरी आणि घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. ऑटोने घरी परतलेल्या महिलेच्या बॅगमधील सोन्याचे दागीने व रोख असा एकूण ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने लंपास केल्याची घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे.

कल्पना चंद्रशेखर पिल्लारे (वय ३६, रा. महादेवनगर, दत्तवाडी) असे या महिलेचे नाव आहे. त्या बाहेरगावाहून नागपुरात परतत होत्या. जयप्रकाशनगर येथे उतरून त्या ऑटोने इतर प्रवाशांसह बसून आपल्या महादेवनगर येथील घरी परत आल्या.

Advertisement

घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या बॅगसह सामानाची पाहणी केली असता त्यातील सोन्याचे दागीने व रोख ११०० रुपये असा एकुण ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement