Published On : Wed, Dec 18th, 2019

सीएएला’ विरोध हा केवळ मतांच्या लांगुलचालनासाठी – आ. शेलार

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीचे शासन केंद्र शासनातर्फे बनविण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) केवळ मतांच्या लांगुलचालनामुळे विरोध करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.

राज्य शासन केवळ विशिष्ट समाजाची आणि गटांची मते आपल्याला मिळावी या उद्देशाने ‘सीएए’ला विरोध करत आहे. विधानसभेत बुधवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी ‘सीएए’ कायदा घटनाविरोधी असल्याचे मत मांडले. यावर भाजपच्या आमदारांची आक्षेप घेतला.

तुर्तास शिवसेनेने ‘सीएए’वर स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करत हा कायदा महाराष्ट्रात लागू करत शासन देशहिताची भूमिका घेणार का? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला.