Published On : Mon, Apr 30th, 2018

भारतीय बौद्ध महासभा व्दारे थाटात बुद्ध जंयती साजरी

कन्हान: भारतीय बौद्ध महासभा कन्हान च्या वतीने बुद्ध जयंती निमित्त गणेश नगर येथील कन्हान बुद्ध विहार येथून भारतीय बौद्ध महासभा च्या महिलांनी पंचशील ध्वज घेऊन तथागत गौतन बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जय घोष करीत कन्हान परिसरातील सर्व विहारात जाऊन गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विश्वात शांती नांदण्याकरिता तथागत गौतम बुद्ध यांच्या शांतीच्या मार्गावर चालण्याचे आव्हान केले. तथागत गौतम बुद्ध जंयती कार्यक्रमात मोठय़ा संख्येने कन्हान येथील बौद्ध उपासिका व महिला सहभागी झाल्या होत्या.