Published On : Mon, Apr 30th, 2018

१ मे महाराष्ट्रदिनी श्रीरंग संगीत विद्यामंदीराचा ३० वा वर्धापनदिन

नागपूर: स्थानिक रेशीमबागेतील श्रीरंग संगीत विद्यामंदीराचा ३० वा वर्धापनदिन १ मे २०१८ रोजी महाराष्ट्र दिनी संध्याकाळी ६.३० वाजता श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान, रेशीमबाग येथे आयोजीत करण्यात आला असुन या प्रसंगी मुंबई येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका मीनल नातू यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

मीनल नातू ह्या किराणा घराण्याच्या गायिका स्व उषाताई पारखी यांच्या शिष्या असुन पुढील संगीताचे मार्गदर्शन जयपुर घराण्याच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मविभूषण किशोरीताई आमोणकर यांचेकडुन घेतलेलं आहे. तबलासंगत राम खडसे – संवादिनी संगत श्रृती पांडवकर करतील .

या कार्यक्रमाचे उदघाटन श्रीरंग संगीत विद्यामंदीराचे संचालक ज्येष्ठ संगीतकार श्री गिरीशजी वराडपांडे यांचे शुभहस्ते तसेच प्रमुख अतिथी म्हणुन पं रघुनाथराव बोबडे, नगरसेविका शीतल प्रशांतजी कामडे उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचा संगीतप्रेमींनी उपस्थित राहुन आस्वाद घ्यावा ही विनंती डाॅ श्रीरंग वराडपांडे यांनी केली आहे.