Published On : Wed, May 26th, 2021

बसपाने दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन केले

Advertisement

नागपुर – तथागत गौतम बुद्ध यांच्या 2065 व्या जयंती निमित्ताने बहुजन समाज पार्टीने त्यांना दीक्षाभूमी येथे जाऊन अभिवादन केले. तथागत गौतम बुद्ध ह्यांच्या जीवनात आजच्या दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेला जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना घडल्या. त्यामुळे या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अडीच हजार वर्षापूर्वी 14 ऑक्टोबर 1956 ला ज्या दीक्षाभूमीवर तथागत बुद्धाच्या धम्माचे चक्र फिरविले त्याच दीक्षाभूमीला अभिवादन बहुजन समाज पार्टीने केले.

लॉकडाऊन असल्याने दीक्षाभूमीचे मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आल्याने शासकीय नियमांचे पालन करुन प्रवेश द्वाराच्या बाहेरूनच तथागत बुद्धाला अभिवादन करण्यात आले.

यावेळी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा सचिव अभिलेश वाहने, दक्षिण पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष सदानंद जामगडे, मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष नितीन वंजारी, दक्षिण-पश्चिम चे महासचिव सुरेंद्र डोंगरे, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, शिवपाल नितनवरे, चंद्रकांत कांबळे, भालचंद्र जगताप, चंद्रमणी गणवीर, प्रकाश फुले, सुमित जांभुळकर आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

बुद्ध मूर्तीला अभिवादन

दक्षिण नागपुरात रामेश्वरी रोडवर कुंजीलाल पेठेत असलेली अत्यंत जुनी व सुरेख पूर्णाकृती बुद्ध मूर्तीला या सर्व बसपा नेते व कार्यकर्त्यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.