नागपुर – रास्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राकृत आणि बौद्ध अध्ययन विभागाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र परिसरात आज बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले.
आजच्या दिवशी तथागत बुद्धांचा जन्म, ज्ञान प्राप्ती व महापरिनिर्वाण अशा तिन्ही ऐतिहासिक घटना घडल्याने आजच्या दिवसाला त्रिगुनी वैशाख पौर्णिमा संबोधल्या जाते. आजच्या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन बुद्धिस्ट स्टुडंट असोसिएशन च्या वतीने बौद्ध अध्ययन केंद्राचे विभाग प्रमुख प्रो. डॉ नीरज बोधीसर यांच्या हस्ते आज विभागात बोधीवृक्ष रोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी डॉ नीरज बोधी सर ह्यांनी ज्या बोधिवृक्षा खाली सिद्धार्थाला ज्ञान प्राप्ती झाली व पुढे ते सम्यक संबुद्ध झाले त्या बोधिवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगितले. व त्याचे प्रतीक म्हणून 24 तास ऑक्सीजन देणाऱ्या बोधीवृक्षाचे जगात अनन्य साधारण महत्व असल्याची यावेळी माहिती दिली.
यावेळी प्रा डॉ तुळसा डोंगरे, प्रा डॉ सरोज वाणी (चौधरी) तसेच स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष भिक्खू महेंद्र कौसल, सचिव उत्तम शेवडे, सिद्धार्थ फोपरे, शामराव हाडके, सखाराम मंडपे, प्रसेनजीत फोपरे प्रामुख्याने उपस्थित होते.
बौद्ध तत्वज्ञानावर ऑनलाईन व्याख्यान
वैशाख पोर्णिमे निमित्त या प्रसंगी ‘व्यवहारिक स्वरुपातील बौद्ध धम्म’ या विषयावर रातुमनावि चे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रो डॉ विकास जांभुळकर ह्यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पाली-प्राकृत व बुद्धिस्ट स्टडी चे विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी सर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत बुद्धाला वंदन केल्यावर तनुजा झीलपे ह्यांनी विद्यापीठ गीत गायिले, संध्या खांडेकर ह्यांनी बुद्ध वंदना घेतली, प्रास्ताविक प्रा नीलिमा गजभिये ह्यांनी, संचालन आम्रपाली गजभिये ह्यांनी तर समारोप प्रा नंदाताई भगत ह्यांनी केला.