Published On : Thu, Jul 8th, 2021

महापौर कक्षात बसपाने धरणे दिली

Advertisement

नागपुर– नागपुरातील मनपा शासन प्रशासनाच्या मनुवादी व जनविरोधी धोरणाच्या विरोधात विवीध मागण्यांसाठी आज 7 जुलै ला बसपा नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी बसपा पक्षनेते जितेंद्रजी घोडेस्वार यांच्या नेतृत्वात महापौर कक्षात दिवसभर धरणे दिली.

29 वर्षांपूर्वीच्या यशवंत स्टेडियमवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बनविण्याच्या एकमताच्या प्रस्तावावर अंमल करा, अंबाझरी येथील अवैधरित्या तोडण्यात आलेल्या डॉ आंबेडकर सांस्कृतीक केंद्राचे पुनर्निर्माण करा, मेडिकल चौकातील प्रस्तावित जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज ह्यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक बनवा, मान्यवर कांशीरामजी टी पॉइंट व कांशीरामजी मार्गावरील मेट्रो स्टेशन ला कांशीरामजी ह्यांचे नाव द्या, सेंट्रल जेल मार्गावरील मेट्रो स्टेशन ला दीक्षाभूमी नाव द्या आदी प्रमुख मागण्यासाठी ही धरणे देण्यात आली.

Advertisement
Advertisement

धरणा स्थळी स्वतः मनपा महापौर दयाशंकर तिवारी व अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी प्रत्यक्ष येऊन बसपाचे निवेदन स्वीकारले. महापौर तिवारी यांनी या निवेदनातील पाचही प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बसपा च्या समर्थनार्थ नगरसेवक मनोज सांगोळे व मनपातील विपक्ष नेते प्रभाकर दटके प्रामुख्याने उपस्थित होते.

धरणे व निदर्शने आंदोलनात प्रदेश बसपा चे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे, जिल्हा बसपा चे नितीन शिंगाडे, विजय डहाट, विलास सोमकुवर, इंजिनियर राजीव भांगे, योगेश लांजेवार, राजू चांदेकर, गौतम पाटील, सदानंद जामगडे, प्रवीण पाटील, सुरेंद्र डोंगरे, आदाब खान, प्रणय मेश्राम, सुबोध गणवीर, सतीश पानेकर, सुबोध साखरे, परेश जामगडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisementss
Advertisement
Advertisement
Advertisement