Published On : Tue, Aug 20th, 2019

समता नगरात दिवसाढवळ्या तरुणाचा निर्घृण खून

Advertisement

कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पोरवाल कॉलेज जवळील समता नगर परिसरात दिवसाढवळ्या अज्ञात आरोपीनी एका 18 वर्षीय तरुणावर तीक्ष्ण अवजाराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव सौरभ सिद्धार्थ सोमकुवर रा लुंबिनी नगर कामठी असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक तरुणाचा भाऊ सुरज सिद्धार्थ सोमकुवर ची मागील काही महिन्यांपूर्वी चोरी प्रकरणात नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून मृतक तरुणाला मोबाईल चोरी प्रकरतनातील मोबाईल मध्ये असलेल्या सिम कार्ड वरून तपास कामासाठी पोलीसाकडून बोलावणे होत होते . मृतक तरुण हा गोयल टॉकीज चौक स्थित गणेश फोटो स्टुडिओ मध्ये खाजगी पद्धतीने कार्यरत होता मात्र काही दिवसापासून या मृतक तरुणाची प्रकृती असवस्थ असल्याने कामावर जाणे बंद केले असुन घरीच आराम करायचा आज दुपारी 2 दरम्यान वडील सिद्धार्थ सोमकुवर ला एकटीवा दुचाकी क्र एम एच 40 ए वाय 5993 ने मोटर स्टँड चौकात सोडून भुयार पुलिया मार्गे घरी जात असता नजर ठेवून असलेल्या अज्ञात आरोपीनो समता नगर परिसरात तरुणावर हल्ला चढवीत तरुणाच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर असे 16 च्या वर धारदार शस्त्राने सपासप वार करून जागीच ठार केला .

Gold Rate
29 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,39,100/-
Gold 22 KT ₹ 1,29,400 /-
Silver/Kg ₹ 2,49,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी आरोपीने पळ काढण्यात यश गाठले.घटनेची माहिती मिळताच एसीपी राजेश परदेसी, पोलिस निरीक्षक संतोष बाकल , आदी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनार्थ मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णलयाय हलविण्यात आले.तर या संदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 302 अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

खुनाचे रहस्य अजूनही गुलदस्त्यात असून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारावर लवकरच आरोपीचा छडा लावण्यात येईल व खुनाचे रहस्य सुदधा उघडकीस येणार आहे. हा तरुण मृतक कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीत समावेश नसून शिक्षित असून चांगल्या मनमिळावू स्वभावाचा होता.तर या मृतक तरुणावर 15 दिवसांपूर्वी सुद्धा ड्रॅगन पॅलेस पोलीस चौकी जवळ हल्ला झाला होता कसाबसा गोंडवाना झाडी झुडपात लपून जीव वाचवून पळ काढीत सुरक्षित घरी पोहोचला होता त्यामुळे हा खुन सुद्धा नजर ठेवून बसलेल्या त्याच आरोपीनि केला असावा या चर्चेला उधाण आहे.

मृतकाच्या पाठीमागे आई, वडील, एक मोठा भाऊ व एक लहान बहीन असा आप्तपरिवार आहे.घटनास्थळावर खुनाचा सडा पसरला असून मृतकाचे शरीर । रक्ताने माखलेले होते यावेळी मृतकाच्या शरीरावर कुठल्यातरी वचपा काढण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निदर्शनास आले घटनास्थळाहुं न मृतक वाहून नेत असलेली एकटीवा दुचाकी जप्त करण्यात आली असून पोलीस या खून प्रकरणाचे रहस्य उलगडन्यात गुंतलेली आहे.

संदीप कांबळे कामठी

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement