Published On : Thu, Feb 13th, 2020

दिव्यांगाच्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत काचुरवाही येथील मुले चमकले

Advertisement

7 सुवर्ण पदक , 3 रजत पदक 6 कांस्य पदक

रामटेक : मतिमंद युवक विकास शिक्षण व प्रशिक्षण संस्था व्दारा संचालित सूरज मतिमंद मुला- मुलीची निवासी शाळा काचुरवाही व एकविरा मतिमंद मुलाचे बालगृह काचुरवाही येथील मुलांनी नागपूर येथे समाजकल्याण विभागा तर्फे ईश्वर देशमुख मैदानावर होनाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत संस्थेचे सचिव जितेंद्र गोल्हर व शाळा प्रमुख टि पि जूनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष सुनील आकरे यांनी जागेवरून उडी यात सुवर्ण, 100 मीटर धावण्यात कांस्य पदक, विशाल प्रमोद भोयर याने 100 मिटर धावण्यात सुवर्ण पदक व लांब उडीत रजत पदक, रंजना दिलीप कुळे हिने लांब उडीत सुवर्ण पदक, एकविरा येथील बाबू 200 मिटर व 100 मीटर मध्ये सुवर्ण पदक तर रवी याने 200 व लांब उडी मध्ये सुवर्णपदक बहुविकलांग गटात करुणा दुधकवरे हिने बाटलीत बॉल टाकणे यात रजत पदक तर भर-भर चालणे यात कांस्य पटक मिळविला काचुरवाही शाळेला एकूण सात सुवर्ण,तीन रजत व सहा कांस्य पदक प्राप्त केले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संगीताताई गोल्हर, उपाध्यक्ष प्रकाश कुंभलकर, संस्थापक गणेश गोल्हर, कोषाध्यक्ष विलास फटिंग यांनी मुलाचे अभिनंदन केले मुलाच्या यशाकरिता शारीरिक शिक्षक अमोल खडोतकर, विशेष शिक्षक सचिन रोकडे, कृष्णकांत जागंडे, निलेश बडवाईक, नंदकिशोर भोयर, प्रवीण मडावी, प्रशांत चरपे, हरीश गोल्हर, सहारे, गणेश गायकवाड, पार्वती आकरे आदींनी प्रयत्न केले

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement