Published On : Thu, Feb 13th, 2020

‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’ १ मार्चला महापौरांनी घेतली नगरसेवकांसोबत बैठक

नागपूर : नागपूर शहरातील नवसंशोधकांच्या संकल्पनांना व्यासपीठ निर्माण करून या संकल्पनांचा उपयोग आपल्या शहरातील सकारात्मक बदलासाठी करण्याच्या हेतूने येत्या १ मार्चला ‘मेयर इनोव्हेशन अवार्ड’चे आयोजन करण्यात आले आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये १ मार्चला सायंकाळी ६ वाजता ‘मेयर इनोव्हेशन अवार्ड’चा भव्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यासंबंधी बुधवारी (ता.१२) महापौर संदीप जोशी यांनी नगरसेवकांशी संवाद साधला.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर नंदा जिचकार, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त (सा.प्र.वि) महेश धामेचा, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. प्रशांत कडू, इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर यांच्यासह सर्व समिती सभापती, सर्व झोन सभापती, नगरसेवक, नगरसेविका प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’ करिता ऑनलाईन प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहे. इच्छुकांना २० फेब्रुवारीपर्यंत www.mayorinnovationawards.in या संकेत स्थळावर आपले प्रस्ताव ऑनलाईन नोंदविता येतील. प्रस्ताव सादर करताना आपल्या क्षेत्रातील नावीन्यपूर्ण योगदान, यामधील अनुभव, पुरावे, छायाचित्रे, पुरस्कार आणि संदर्भ इत्यादी माहिती स्कॅन कॉपीसह संकेत स्थळावर अपलोड करावी लागेल. प्रस्ताव ऑनलाईन सबमीट केल्यानंतर प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी ई-मेलने पोचपावती मिळाल्याची खात्री करून घ्यावी. सादर केलेल्या प्रस्तावातून निवड झालेल्या प्रस्तावांना १ मार्च रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी ६ वाजता ‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या परिसरातील नाविन्यपूर्ण कामगिरी करणा-यांची माहिती देउन त्यांच्या प्रस्तावाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी यावेळी केले.

प्रारंभी इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर यांनी ‘मेयर इनोव्हेशन अवार्ड’ची संकल्पना स्पष्ट केली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement