| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Oct 11th, 2018

  मुलाने वडीलाला कु-हाडीने मारून गंभीर जखमी केले

  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर येथे वडील व मुलाच्या भांडणात मुलाने वडीलांच्या डोक्यावर, पाठीवर व कमरेवर धारदार कु-हाडीने पाच घाव मारून गंभीर केले .

  बुधवार (दि.१०) ला सायंकाळी ६. ३० वाजता दरम्यान प्रभाग क्र.४ सत्रापुर येथील जखमी माणिकराव आत्माराम मोटघरे वय ७० वर्ष व आरोपी मुलगा शेखर माणिकराव मोटघरे यांनी वडिलांना शिवीगाळ केली असता वडीलांनी म्हटले की , तु दारू पिऊन धिंगाणा करतो म्हणुन तुला घरातील हिस्सा देणार नाही .

  असे म्हटल्यावर मुलगा शेखर यांने घरातुन धारदार कु-हाड आणुन वडीलांच्या डोक्यावर, पाठीवर व कमरेवर पाच घाव मारून गंभीर जखमी केले .

  माणिकराव मोटघरे यांचा मेयो रूग्णालय नागपुर येथे उपचार सुरू आहे . कन्हान पोलीसांनी फिर्यादी मुलगा धर्मराज माणिकराव मोटघरे वय ४० वर्ष रा. सत्रापुर कन्हान यांच्या तक्रारीवरून आरोपी शेखर मोटघरे यांच्या विरुद्ध कलम ३०७ भादंवि नुसार गुन्हा दाखल करून पो.उप.निरिक्षक प्रल्हाद धवड पुढील तपास करीत आहे .

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145