Published On : Thu, Aug 12th, 2021

अन् बीडीडीएसने केला बॉम्ब निष्क्रिय

Advertisement

-अफवेच्या बॉम्बसाठी बीडीडीएस अन् श्वान पथक,बॉम्ब असलेली बॅग इंजिनाजवळ,पोलिस अधीक्षकांची उपस्थिती

नागपूर- मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावरील बुलंद इंजिनाजवळ पार्किंगच्या जागेत एका कारखाली काळ्या रंगाच्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याची खळबळजनक माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे साèयांची तारांबळ अ्न धावपळ उडाली. माहिती मिळताच केवळ ९ मिनिटात बॉम्ब शोध व नाशक पथक तसेच श्वान पथक घटनास्थळी पोहोचले. शहर पोलिसांतील बीडीडीएस आणि आरपीएफचे श्वान पथकही धडकले. बॅगची तपासणी केल्यानंतर निर्जनस्थळी बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला. ही केवळ रंगीत तालिम असल्याचे पोलिसांना सांगण्यात आल्यानंतर साèयांनीच सुटकेचा श्वास घेतला.

पोलिस नियंत्रण कक्ष (अजनी मुख्यालय) येथे दुपारी १२ वाजताच्या सुमारास एक फोन आला. रेल्वे स्थानक परिसरात एक काळ्या रंगाची बॅग इंजिनाजवळ बेवारस आहे. या बॅगमधून ‘टिक.. टिकङ्क असा आवाज येत आहे. पार्किंग परिसरातील या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला. बीडीडीएसचे उपनिरीक्षक कविकांत चौधरी, ऋषिकेश राखुंडे, मनोज बोराडे, भावेश राणे, नागेश चोरपगार, राहुल गवई, लीना आष्टनकर, श्वान हस्तक सुनीता रौराळे, राहुल सेलोटे यांनी घटनास्थळ गाठले. शहर पोलिसातील बीडीडीएसचे पथकही वेळेत पोहोचले.

तत्पूर्वी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, पोलिस निरीक्षक मनिषा काशिद उपस्थित होत्या. पथकाने सर्वप्रथम परीसर सील केला. मार्शल आणि योद्धा या श्वानांनी बॅगची तपासणी करताच स्फोटक पदार्थ असल्याचा इशारा दिला. या घटनेमुळे भारवाहक (कुली), ऑटोचालक आणि प्रवाशांत भीती निर्माण झाली. सावधगिरी बाळगत तांत्रिक बाबींचाा आधार घेऊन पथकाने बॅग तब्यात घेतली आणि पोलिस लाईन टाकळी परिसरातील मोकळ्या मैदानात नेऊन बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाच्या पृष्ठभूमीवर घातपात कारवायावर नियंत्रण मिळविण्यासाठी बीडीडीएस आणि श्वास पथक किती सज्ज आहे. याची चाचपणी करण्यासाठी ही रंगीत तालिम घेण्यात आल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.