Published On : Thu, Aug 12th, 2021

शनिवारी बसपा चा महिला मेळावा – महापौर बनाओ अभियान अंतर्गत

नागपुर – बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने शनिवार 14 ऑगस्टला महिला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. बसपाचे राष्ट्रीय समन्वयक व खासदार रामजी गौतम, राष्ट्रीय महासचिव व प्रदेश प्रभारी एडवोकेट वीरसिंग जी, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद जी रैना व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड संदीपजी ताजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात या महिला कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

महिला कार्यकर्ता शिबिर दक्षिण नागपुरातील चंद्रमणी नगर गार्डन शेजारच्या पवार विद्यार्थी सभागृहात शनिवारी दुपारी 11 वाजता होत असून मेळाव्याला प्रदेश बसपा चे नागोराव जयकार, रवींद्र गवई, महेंद्र रामटेके, उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, नितीन शिंगारे, विजय कुमार दहाट, बबलु डे, शहराध्यक्ष राजू भांगे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, नगर नगरसेविका वंदना चांदेकर, वैशाली नारनवरे, मंगला लांजेवार, विरंका भिवगडे, ममता सहारे, नरेंद्र वालदे, इब्राहिम टेलर, संजय बुरेवार, रमाताई गजभिये, प्रवीना शेळके, तेजस्विनी धुर्वे, सविता पाटील, पुष्पा बेडसे, सत्यभामा लोखंडे, हर्षला जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित राहतील.

Advertisement

महिला कार्यकर्ता शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन रंजना ढोरे, तारा गौरखेडे, कविता लांडगे, सुरेखा डोंगरे, सुनंदा नितनवरे, वर्षा वाघमारे, पुष्पा पाटील, प्रिया गोंडाने, वर्षा सहारे, चंदा झोडापे, बबीता डोंगरवार, साधना काटकर, माया उके आदींनी केले आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement