Published On : Tue, Aug 13th, 2019

गट ग्रामपंचायत कांद्री(खदान) ला माॅयल लिमिटेडने दिली शव वाहिनी(स्वर्ग रथ)

रामटेक : दिनांक 10 आॅगष्ट2019 रोजी माॅयल अंतर्गत सीएसआर निधीमधून गट ग्रामपंचायत कांद्री (खदान) ला शव वाहिनी पुरविण्यात आली. सकाळी अकराच्या सुमारास रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार रेड्डी यांचे उपस्थितीत शव वाहिनीचे पूजन गट ग्रामपंचायत येथील सरपंच उपसरपंच व इतर सदस्यांनी केले. त्यानंतर शव वाहिनीची कागदपत्रे व शव वहिनी ची चाबी ग्रामपंचायत सरपंच परमानंद शेंडे यांना सोपविण्यात आली.

मॅग्नीज और इंडिया लिमिटेड कांद्री(खदान)अंतर्गत सीएसआर निधीमधून हा उपक्रम राबविला गेला असल्यामुळे येथील गावकरी लोकात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आमदार रेड्डी यांच्या प्रयत्नामुळेच शव वाहिनी मिळालेली आहे. ग्रामपंचायत समोरील महामार्गावर लवकरच अंडरपास चे काम सुरू होणार असल्याचे आश्वासन आमदार यांनी दिले.यावेळी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार रेड्डी,

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माॅयल लिमिटेडचे डेप्युटी जनरल मॅनेजर आर यू सिंग, कांद्री माईन येथील मॅनेजर आर एस खान, महाप्रबंधक रमणकुमार शर्मा, एमके बरुआ, निरंजन पराते, विकास सिंग, निषाद निकोसे, नितीन कथडे (सर्व प्रबंधक) गट ग्रामपंचायत सरपंच परमानंद शेंडे, उपसरपंच मंजीत बहेलिया, सदस्य विकी देशमुख, लक्ष्मी इळपाते, मोरेश्वर सलामे , गुरुनाथ कठौते व गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.

Advertisement
Advertisement