Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Feb 24th, 2020

  भाजपाचे राज्यसरकारच्या धोरणाविरुद्ध धरणे आंदोलन एक थोतांड

  – राज्याच्या समस्यांचे मुळ भाजपच्या केंद्राच्या सरकारचेच चुकीचे धोरण -किशोर तिवारी

  नागपुर : महाराष्ट्र भाजपचे २५ फेबु .ला राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरुद्धचे राज्यव्यापी धरणे आंदोलन एक थोतांड असल्याची टीका शेतकरी नेते व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केली आहे . सध्या राज्यातील शेतकरी ,शेतमजुर ,रोजगार ,उद्योग ,प्रचंड आर्थिक मंदी ,सामाजिक सामंजस्य या क्षेत्रात राज्यात अस्तित्वात असलेल्या सर्वच समस्यांचे मुळ केंद्रांतील दिशाहीन नरेंद्र मोदी यांचे एकाधिकारवादी सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विफलतेचा परिणाम असुन जर राज्य भाजपाला चुकीच्या धोरणावर धरणे आंदोलन करावयाचे असल्यास त्यांनी केंद्राविरुद्ध आंदोलन करावे असा सल्ला दिला आहे .

  किशोर तिवारी हे मागील ५ वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा घेत शेतकरी मिशनचे अध्यक्ष होते मात्र विधानसभा निवडणुकीपुर्वी त्यांनी भाजपच्या सरकारला रामराम ठोकत शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी सलगी करीत शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला होता मात्र त्यांनी मागील ५ वर्षात भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाचा सतत विरोध केला होता व केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील समस्यांचे जड असलेल्या प्रमुख मुद्दे लागवडीचा खर्च कमी करणे ,शेतीमालाला रास्त भाव व योग्य शोषण विरहीत बाजार देणे ,सर्व शेतकऱ्यांना सहज पतपुरवडा धोरण राबविणे , अन्नाच्या व तेलबियाणांच्या पिकांना विषेय अर्थ सहाय्य देत पीकपद्धती राबविणे तसेच शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटापासुन संरक्षण देणारी विपदा प्रबंधन व्यवस्था तसेच शेतकऱ्यांचे हित जपणारी पीकविमा योजना आणणे या सारख्या भाजपचे सरकार असणाऱ्या राज्यांनी केलेल्या मागण्यासुद्धा केराच्या टोपलीत टाकणाऱ्या विषयांवर काम न करता आपल्या उपशयाचे खापर राज्य फडात असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे .

  आपण भाजपच्या शेतकरी व गरीबांच्या प्रेमाला व धरणे आंदोलनाला थोतांड म्हणुन केलेली टीका फक्त भाजपशी सलगी कमी झाल्यामुळे नसुन आपला हा त्रागा आपण मागील ५ वर्षात अनेकदा जाहीरपणे प्रगत केला आहे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्या उमेदीने काम करीत आहेत त्यांनी सर्वांशी खुल्या मनाने चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयन्त करीत आहे मात्र केंद्र सरकारने सुरु केलेल्या असहकार्याच्या भुमिकेने त्यांची प्रचंड कोंडी करण्याचा खाणेरडा प्रयन्त होत आहे . केंद्राने सर्व लोककल्याणकारी योजनांना सध्या रोखल्याच असुन फक्त धर्म जात दांभीक राष्ट्रवाद यामध्ये देशाचे सौंदर्याचे वातावरण कट रचुन गृहमंत्री अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध असतांनाही करीत असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी यावेळी केला .

  शिवसेनेने भाजपला आपली जागा दाखवत सत्तेचा अमरपट्टा तुमच्या नावाने नाही असा निरोप दिल्यावर काहींना हा बदल पचत नसुन त्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी उद्धवजींची साथ न देता फक्त ८० दिवसात उपशय आले व आपली धोरणे जनतेच्या विरोधी आहेत अशी ओरड सामान्य जनतेला आवडत नसुन असल्या एकरी मुख्यमंत्र्याना टोमणे सतत मारल्याने माजी मुख्यमंत्री यांची जनमानसातील प्रतिमा खराब होत असल्याची खंत व्यक्त करीत नोटबंदी नंतर केंद्राच्या असहकारामुळे राज्याची झालेली दैनाव्यस्था ,प्रचंड महागाई ,आर्थिक मंदी ,शेतकऱ्यांची उत्पनात झालेली घट ,समाजात धर्म व जातीच्या नावावर भाजपने सुरु केलेला संघर्ष मोडून काढण्यासाठी सर्वसामान्य जनतेनी २५ फेबु भाजपच्या ठाकरे सरकार विरोधी आंदोलनांवर बहीष्कार टाकावा असे आवाहन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले आहे ,


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145