कन्हान : – शहर विकास मंच द्वारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०२ व्या जयंती संताजी नगर कांद्री-कन्हान येथे थाटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा कांद्री ग्राम पंचायत सदस्य सिंधुताई वाघमारे यांच्या हस्ते व मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे, ताराचंद निबांळकर, प्रल्हाद वाघमारे यां च्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमा ची सुरूवात करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने उप स्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे हयांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित मंच पदाधिका-यारी व सद स्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करित १०२ वी जयंती थाटा त साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र साबरे यांनी तर आभार ऋृषभ बावनकर यांनी व्यकत केले.
याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव सुरज वरखडे, सहसचिव प्रकाश कुर्वे, हरीओम प्रकाश नारायण, सुरेश आंबीलडुके, धर्मेंद्र गणवीर सह मंच पदाधिकारी व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.