Published On : Tue, Aug 2nd, 2022
By Nagpur Today Nagpur News

महात्मा गांधी विद्यालयात विज्ञान प्रदर्शनीचे उदघाट्न

Advertisement

– शिक्षक आमदार नागो गाणार यांची उपस्थिती
– प्रत्येक मॉडेलची विद्यार्थ्यांकडून घेतली माहिती

नागपूर: ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त महात्मा गांधी सेन्टेनियल इंग्लिश हायस्कूल येथे नुकतेच विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीचे उद्घटन शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या हस्ते झाले.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वर्ग ५ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर विज्ञान प्रोजेक्ट तयार करीत आपल्या बुद्धिमत्तेचे कसब येथे सादर केले. शेतकऱ्यांच्या उपयोगात येणारे सोलर सिंचन यंत्रणा यावर या चिमुकल्यांचा अधिक भर दिसला. महाराष्ट्रात विजेचे वाढते दर शेतकऱ्यांना जीवघेणे ठरत आहे. एकीकडे सावकार, बँक, सहकारी पथ संस्था यांच्या कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला शेतातील विजेचे बिल भरणे कठीण झाले आहे.

शेतकऱ्यांना यातून वाचिवण्याचा एक उत्तम संदेश देणारे मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले. सोलर सिस्टिम, पवन चक्की यातून वीज निर्मिती करून शेतीला आवश्यक तेवढे पाणी सिंचनासाठी कसे उपलब्ध होईल हे मॉडेलमधून सादर केले. यात स्वारित शेखर गजभिये व इतर विद्यार्थ्यांचे सोलर सिंचनावरील मॉडेल आकषर्क ठरले.

उद्घटनानंतर आमदार गाणार यांनी सर्व मॉडेल्सची पाहणी केली तसेच माहिती जाणून घेतली. दरम्यान शाळा मंत्रिमंडळाचेही उद्घटन करण्यात आले. यावेळी संचालिका विना बजाज, प्राचार्या डिम्पी बजाज, इंग्लिश प्रायमरीच्या मुख्याध्यापिका डायना अब्राहम, सिंधू सेन्टेनियलचे उप मुख्याध्याक सुदाम राखडे आदी उपस्थित होते.
—००—

Advertisement
Advertisement