Published On : Wed, Jun 27th, 2018

घोटीटोक येथे विधुत उपकेंद्राचा भूमिपूजन संपन्न

रामटेक: घोटीटोक महादुला येथिल विधुत उपकेंद्राचाआमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पाठपुरावा केला त्यामुळे त्यांना साथ देत ग्रामीण जनतेच्या समस्यांचे निराकरण व्हावं याकरिता महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेऊन पूर्व विदभातील विधुत प्रणालीचे सक्षमीकरण, बळकटीकरण करण्याकरितेच्या योजनेअंतर्गत नवीन 33/11 के.व्ही.घोटीटोक (महादुला)ता.रामटेक येथील विद्युत उपकेंद्राचा भूमिपूजन समारंभ महावितरण च्या वतीने रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते पार पडला.

यावेळी प्रामुख्या.जिल्हा परिषद सदस्य शोभा झाडे ,रेखा उईके सरपंच माहादुला,,,कृउबासचे मुख्य प्रशासक अनिल कोल्हे ,उपमुख्य प्रशासक किशोर राहागडले ,महावितरण चे प्रादेशिक संचालक बालचंद खंडाइत ,मुख्य अभियंता ,नागपूर परिमंडळ दिलीप घुगल तसेच मान्यवर मंडळी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होती. सभेला संबोधित करतांना बालचंद खंडाईत म्हणाले की ,महाराष्ट्र शासनाने पूर्व विदरभातील विधुत प्रणालीचे बळकटीकरण व सक्षमीकरण करण्यासाठी 700 कोटी रुपयांचा निधी दिला त्यातून हे उपकेंद्र तयार होणार आहे .आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सातत्याने या कामासाठी पाठपुरावा केला.हे विधुत उपकेंद्र 6 महिन्याच्या अवधीत तयार होणात असून शेतकरी व ग्रामीण जनतेला त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

सभेला मार्गदर्शन करतांना आमदार रेड्डी म्हणाले की ,महादुला परिसरातील 40 गावांना मोठ्या प्रमाणावर विधुत समस्या होती .आता उपकेंद्र तयार झाल्यावर ती समस्या दूर होणार आहे.शेतकऱ्यांना शेतपिकास पाणी देण्यासाठी तसेच ग्रामीण जनतेला विजेची फार गरज असते.या भागातील लोकांनी वेळोवेळी या समस्येचा नागरिकांनी माझ्याकडे पाठपुरावा केला .त्यांच्या समस्यांची दखल मी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कडे पाठपुरावा करून विनंती केली . ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्वरित समस्येची दखल घेतली त्यामुळे हे उपकेंद्र तयार होणार आहे .आता या भागातील विजेची समस्या सुटणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण आमझरे अधीक्षक अभियंता, राकेश जनबंधु, सुहास चवरे, अभियंता परांजपे ,उपकार्यकारी अभियंता गुणवंत पिसे,सहाय्यक अभियंता निकिता कुमरे पवन जाधव अधिकारी वर्गाने तसेच महावितरणचे विविध पदावर काम करणारे अभियंता , अधीकारी,कर्मचारी यांनी कार्य केले. माहादुला व परिसरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी,शेतकरी, व ग्रामीण नागरिक मोठया प्रमाणात कार्यक्रमास उपस्थित होते.