Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Sep 24th, 2020

  सरपच्या नी केला बेलावासी यांचा विश्र्वासघात गावात आता सुरु होणार

  दारूची फॅक्टरी ठराव न घेता बेला येथे अल्कोहोल च्या कारखान्याला मंजुरी

  उमरेड तालुक्यातील उमरेड नंतर सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव बेला. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे स्वातंत्र्यासाठी मोठी चळवळ उभी राहिली अनेक स्वातंत्र्यवीर येथे जन्मले आपल्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी बेला गावाला इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले आणि त्याच पार्श्वभूमीवर या गावाला 1972 मध्ये महाराष्ट्र शासनाने दारूबंदी आदर्श गाव म्हणून गौरवण्यात आले या गौरवासाठी येथील अनेक मान्यवरांनी अथक परिश्रम घेत सर्व गावकऱ्यांना अनेक व्यसनापासून दूर ठेवत आणि त्यांचा परिणाम म्हणून दारू मुक्तीचा पुरस्कार भेटला .

  परंतु आता मात्र याच गावाला शपित सौदर्यसरखेत काळे फासणारे काम तथाकथित बेला गावच्या सरपंच सुनंदा ऊकुंडे व त्यांच्या सोबतीला ग्रामसचिव बानाबाकोडे करीत असल्याचे नुकतेच गावकऱ्यांच्या निदर्शनास आले बेला ग्रामपंचायत सन 1958 स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत ग्रामपंचायतिवर पुरुष म्हणून सरपंच विराजमान झाले परंतु महिला आरक्षणामुळे या पदावरती बेल्याच्या इतिहासात प्रथमच महिला सरपंच निवडून आल्या. इतिहासात तो महिलांसाठी गौरवाचा क्षण होता. परंतु याच महिला सरपंचाने बेल्याच्या परिसरात एम एस बी. इथेनाल व अल्कोहल बनविणार्‍या कंपनीला परवानगी दिल्याचे उघडकीस आले.

  26 जानेवारी 2020 ला सरकारी धोरणाप्रमाणे आमंसभा घेण्यात आली ती आमसभा विविध वादग्रस्त मू गाजली व अर्धा तासांमध्येच गुडळली या ग्रामसभेतील प्रोसिडिंग बुकवर खाली जागेल कुणालाही कोणतीच खबर न लागता तसं कंपनी सुरू करण्याची कोणतेही चर्चा न करता विषय पटलावर न घेता त्याच आमसभेत चर्चा झाल्याची कागदोपत्री दर्शवून एम एस बी रसायन कंपनीला ठराव घेऊन ते कारखाना सुरू करण्याची परवानगी परस्पर आर्थिक संबंध जोपासून परवानगी दिल्याची खमंग चर्चा परिसरात सुरू आहे.

  या कारखाना जी जागा मंजूर करण्यात आली त्याच्या जवळपास शाळा लोकवस्ती निर्माण होत आहे आजूबाजूला लेआउट निर्माणधिन आहेत. या कंपनीमध्ये अल्कोहल व इथेनॉल कच्च्या स्वरूपात आणले जाईल व तेथे प्रोसेसिंग प्रक्रिया करून बॉटलिंग केले जाईल हे दोन्ही पदार्थ अतिज्वलनशील असल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची संकेत आहेत म्हणून हा प्लांट एम.आय.डी.सीच्या परिसरात हलविण्यात यावा व होणाऱ्या त्रासाला थांबावे कारण बेला येथून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या पूर्ती पॉवर अंड शुगर लिमिटेड मध्ये मानस ऍग्रो युनिट 1मध्ये एका महिन्यापूर्वी इथेनॉलच्या टाकीचा महाभयंकर स्पोर्ट होऊन पाच कामगार जागीच ठार झाले. घटना ताजी आहे अशात ही कंपनी अगदी का गावाचे प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर आहे गावात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत अल्कोलने होणार असल्याचे संकेत बेला ग्रामपंचायत करीत आहे सतरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये ठराव बाबत कोणालाही व कोणत्याही सदस्याला या कंपनीला सुरू करण्याच्या

  चर्चेबद्दल व ठरावाबद्दल काहीच माहित नसल्याचे सर्व सदस्य बोलतात हा ठराव केव्हा घेतला व चर्चा केव्हा झाली हेच कोणालाही माहित नाही सरपंच सुनंदा उकुंडे व ग्रामसचिव बानाबाकोडे आमसभेतील ठराव प्रोसिडिंग बुकवर कधीच घेत नाही त्या साठी गावकऱ्यांनी वारंवार सूचना करूनही आमसभेत प्रोसिडिंग लिहिल्या जात नाही त्याचाच गैरफायदा घेत सरपंच व सचिव एम एस बी या कंपनीशी आर्थिक हितसंबंध जोडून चुकीच्या मार्गाने हा ठराव पास करून दिला. वास्तविक ही जागा कमर्शियल इंडस्ट्रीमध्ये येत नाही.

  यापूर्वी बेला सरपंच सुनंदा उकूंडे यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप व भोंगळ कारभार केल्या मुळे अविश्वास ठरावाला पुढे जावे लागले होते परंतु गावकर्यांनी पहिला महिला सरपंच व मागास वर्गीय प्रवर्गातून आलेली गरीब बाई म्हणून विश्वास ठेवला याच गोष्टीचा फायदा घेत गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा देत अल्कोहोलची फॅक्टरी सुरू करण्याची परवानगी देऊन गेला गावातील स्त्रियांचे संसार उघड्यावर पडण्याची व गावातील लोकांचा व्यसनाच्या आहारी घालण्याचे काम करीत आहे माझे आता कोणीच काही बिघडवू शकत नाही याच अभी भावात सरपंच या वागत आहे.

  गावाची मागणी आहे की असे किती तरी चुकीचे ठराव सरपंच व सचिव यांनी आर्थिक व्यवहार करून घेतले आहेत. जे गावाच्या हिताचे नाही व त्यावर आमसभेत चर्चा झाली नाही व वरील ठराव नामंजूर करण्याकरिता वेगळा ठरावा घ्यावा किंवा आमंसभेतून हा ठराव पुन्हा पारित करावा तरच एम एस बी कंपनीला दिलेल्या ठराव नामंजूर करून त्यांचे ना हरकत प्रमाण पत्रावर स्थगिती देण्यात यावी व जिल्हा अधिकारी व प्रदूषणबोर्डाकडून जनसुनावणी घेण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे असं न झाल्यास गावातील जनतेने आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा दिलेली आहे.

  सरपंच सुनंदा उकुंडें

  सरपंच या नात्याने गावाचा विकास व्हावा व गावातील लोकांना रोजगार मिळावा याकरिता एम एस बी कंपनी ला 26 जानेवारी 2020 सभेतून ठराव पारित करण्यात आला होता पण या ठरावावर आवक-जावक नंबर नसल्यामुळे तो वैद्य मानले जात नाही त्यामुळे मी लोकांचा कोणताही विश्वासघात केलेला नाही

  तुषार मुठलं बेला


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145