Published On : Tue, Oct 6th, 2020

कोरोनाच्या संकटात गरोदर मातांना मातृ वंदना योजनेचा आधार

लॉकडाऊन काळात 3443 महिलांच्या खात्यावर 1 कोटी 92 लाख जमा

भंडारा : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांशी योजना आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये दिनांक 1 जानेवारी 2017 पासुन संपुर्ण राज्यात लागु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 1 जानेवारी 2017 रोजी अथवा तदनंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसुती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाचे अधिसुचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना गरोदर काळात गरोदर माता, शिशु सुदृढ व निरोगी राहावे. गरोदर मातांना सकस आहार घेता यावा, याकरिता केंन्द्र व राज्य शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यांदा गरोदर असलेल्या मातेस पहिल्या जिवंत अप्रत्याकरिता तीन टपप्यामध्ये 5000 रुपयांची रक्कम दिली जाते. लॉकडाऊन काळात भंडारा जिल्हयातील 3443 महिलांच्या खात्यावर 1 कोटी 92 लक्ष 23 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

गरोदर मातांना स्वत:च्या व शिशुच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस व पौष्टिक आहार मिळणे गरजेचे असते तसेच गरोदर कालावधीत मोलमजुरी करणाऱ्या अनेक महिलांच्या रोजगारही बुडत असतो. सदर महिलांना सकस आहार व अंशत बुडीत मजुरी मिळावी या उद्देशाने शासनाच्या वतीने 01 जानेवारी 2017 या वर्षापासुन प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत पहिल्या जिवंत अप्रत्यापर्यंत सर्वस्तरावरील (गरोदर शासकिय कर्मचारी माता वगळून) 5 हजार रुपयाचा लाभ तीन टप्य्यांमध्ये केंन्द्र शासनाकडुन आधार संलग्न डिबीटव्दारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते.


भंडारा जिल्हयात 01 जानेवारी 2017 पासुन जवळजवळ पावणे चार वर्षांच्या कालावधीत ग्रामीण व शहरी भागातील 27102 लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर 12 कोटी 19 लक्ष 26 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागु केलेल्या लॉकडाऊन कालावधीत गरोदर मातांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. सर्व ग्रामीण व शहरी भागातील प्रथम खेपेच्या गरोदर मातांनी सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्या निकट असलेल्या आशाताई, एएनएमताई व आंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधुन सदर योजनेकरिता लागणारे आवश्यक दस्ताऐवज पुरविण्यात यावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यात करिता आपल्या गावात असणारी आशा ताई, एएनएमताई व अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधुन आवश्यक कागदपत्रे आपल्या जवळच्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक नागरी भंडारा तसेच आरोग्य शासकिय संस्थेशी देण्यात यावे जेणे करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ लवकरात लवकर संलग्न आधार लिंक खात्यावर शासनाव्दारे जमा करण्यात येईल.

 

 

तालुका निहाय लाभार्थ्यांची माहिती

अ.क्र तालुका पात्र लाभार्थी शासनाव्दारे डिबिटीमार्फत आधार संलग्न खात्यावर दिलेली रक्कम
1 भंडारा 4091 18923000
2 लाखांदूर 3284 15019000
3 लाखनी 2707 11751000
4 मोहाडी 3802 17387000
5 पवनी 2801 12271000
6 साकोली 3277 14070000
7 तुमसर 3998 18397000
8 प्रा.आ.केंद्र नागरी, भंडारा 1947 8874000
9 शहरी पवनी 454 1949000
10 शहरी तुमसर 741 3285000
भंडारा जिल्हा 27102 121926000

 

योजनेकरिता लागणारी आवश्यक दस्ताऐवज

· गरोदर मातेचे आधार कॉर्ड

·तिच्या पतीचे आधार कॉर्ड

· बॅक संलग्ण आधार लिंक पासबुक किंवा पोस्टाचे खात्याची झेरॉक्स प्रत.

· गरोदरपणाची 100 दिवसाच्या आत नोंदणीबाबत माता बालसंगोपन कॉर्डाची झेरॉक्स प्रत.

· जर प्रसुती झाली असल्यास बाळाच्या जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण कार्ड.