Published On : Sat, Sep 7th, 2019

कांग्रेस सेवादल महाराष्ट्र प्रदेश संघटक सहसचिव पदी राजकुमार गेडाम यांची नियुक्ती

कामठी:-आगामी विधानसभा निवडणूक तसेच पक्ष संघटन बळकटीचा विषय गांभीर्याने लक्षात घेत अखिल भारतीय कांग्रेस सेवा दलाचे मुख्य संघटक लालजी देसाई व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवादल चे अध्यक्ष विलास औताडे यांनी कांग्रेस सेवा दल चे कामठी-मौदा विधानसभा प्रमुख राजकुमार गेडाम यांची कांग्रेस सेवादल च्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल नवनियुक्त राजकुमार गेडाम यांनी पक्ष संघटन बळकटी साठी सदैव तत्पर राहणार असून नियुक्ती केल्याबद्दल कांग्रेस सेवा दल चे मुख्य संघटक लालजी देसाई, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय कांग्रेस कमिटी चे महासचिव मुकुल वासनिक , महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी महासचिव सुरेश भोयर तसेच कांग्रेस सेवादल चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास औताडे यासह समस्त कांग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.तर या नियुक्तीबद्दल राजकुमार गेडाम यांच्यावर कांग्रेस सेवादल च्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.