Published On : Thu, Aug 11th, 2022
By Nagpur Today Nagpur News

पवनीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात

Advertisement

भंडारा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिर्मीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन पवनी नगरपरिषदद्वारा करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दीप प्रज्वलन करून केले. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, तहसीलदार नीलिमा रंगारी, मुख्याधिकारी डॉक्टर विवेक मेश्राम, प्रशासन अधिकारी आरिफ शेख उपस्थित होते. सर्वप्रथम शहीद प्रफुल्ल मोहरकर यांच्या स्मारकापासून रॅली काढण्यात आली. तसेच पथनाट्य सादर करण्यात आले. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीला शशांक आठल्ये व निनावे यांनी स्वागत गीत सादर केले. विभिन्न प्रदेशातील बोलल्या जाणाऱ्या भाषांवर आधारित नाटीका सादर करण्यात आल्या. लहान मुलांनी उत्कृष्ट वेशभूषा व पोषाख सादर केले. त्यानंतर नियोजित कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भागवत आकरे होते तर प्रमुख अतिथी मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम, प्रशासन अधिकारी आरिफ शेख, भक्तराज गजभिये, प्राचीन पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक पुरातत्व विज्ञ श्याम बोरकर, माजी जवान ईश्वर काटेखाये, सुधाकर धुर्वे, विष्णू वैद्य उपस्थित होते.

Gold Rate
2 May 2025
Gold 24 KT 93,700/-
Gold 22 KT 87,100/-
Silver/Kg 95,400/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांनी केले. प्रस्ताविकातून त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व विभिन्न कार्यक्रमाचे आयोजन याविषयी सांगितले. यावेळी भक्तराज गजभिये यांनी पवनी शहराचा प्राचीन इतिहास व बौद्धकालीन इतिहास यावर प्रकाश टाकला, ईश्वर काटेखाये यांनी देशाच्या रक्षणासाठी जवानांची कामगिरी कशी असते व त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामना करावा लागतो याविषयी मार्गदर्शन केले. विष्णू वैद्य यांनी शहीद प्रफुल मोहरकर यांच्या स्मारकाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने नगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलावे असे सांगितले तर सुधाकर दुर्वे राष्ट्रध्वजाचा अपमान कोणीही करू नये तसेच आपल्या देशावर प्रेम करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भागवत यांनी पवनी शहराचा प्राचीन इतिहास व पवनी शहरातील प्राचीन मंदिरे याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमानंतर वेशभूषा स्पर्धा तसेच वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या .कार्यक्रमाचे संचालन अर्चना देशमुख व निलीमा लेपसे यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी पिंपळकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता नगरपालिकेचे कर्मचारी तसेच शिक्षक गण यांनी सहकार्य केले.

Advertisement
Advertisement