Published On : Fri, Oct 11th, 2019

दुचाकीच्या डिक्कीतून 25 हजार रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मटण मार्केट परिसरात ऍक्टिवा दुचाकी चालकाने भिसीचे मिळलेले 25 हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवून नजीकच्या केरम सेंटर मध्ये जाऊन कॅरम खेळायला गेले असता अज्ञात चोरट्याने संधी साधून उभ्या असलेल्या ऍक्टिवा च्या डिक्कीला डुप्लिकेट चाबी लावून डिक्कीत ठेवलेले 25 हजार रुपये लंपास केल्याची घटना काल रात्री साडे आठ दरम्यान घडली होती

यासंदर्भात फिर्यादी टिपू सुलतान वल्द अब्दुल रहमान वय 58 वर्षे रा कोळसा टाल कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदवीत तपासाला दिलेल्या गतीतून अवघ्या काहो तासानंतर आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले अटक चोरट्याचे नाव जियाउल रहमान उर्फ उर्फ राजू आणीसुररहमान वय 30 वर्षे रा लुंबिनी नगर कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल , एसीपी राजरतं न बन्सोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी पथकातील किशोर गांजरे, विजय सिन्हा, पवन गजभिये आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे


संदीप कांबळे कामठी