Published On : Fri, Oct 11th, 2019

शहरातील बेघरांना मनपातर्फे निवारा व आरोग्य तपासणी

Advertisement

जागतिक बेघर निवारा दिन : निवारागृहात मुलभूत सुविधा उपलब्ध

नागपूर : नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणा-या बेघर व निराधारांना दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे निवारा उपलब्ध करुन देण्यात आला. याशिवाय बेघर व निराधारांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधोपचारही करण्यात आला.

Gold Rate
Apr 25 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जागतिक बेघर दिनानिमित्त मनपा उपायुक्त डॉ.रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, नुतन मोरे यांच्या सहकार्याने बेघर व्यक्तींना निवारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

बेघर व निराधारांना जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाने शहरात पाच ठिकाणी बेघर निवारे सुरू केली आहे. त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जागतिक बेघर दिनाच्या पूर्वसंध्येला विविध ठिकाणी बेघर व्यक्तीची शोध मोहीम राबवून त्यांना निवाऱ्यात आणण्यात आले, निवाऱ्याची स्वच्छता व साफसफाई करून निवारा सजविण्यात आला, बेघरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करून त्यात नि:शुल्क औषधोपचार करण्यात आले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि बेघर संवाद अंतर्गत बेघरांचे समुपदेशन करण्यात आले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement