Published On : Fri, Jun 12th, 2020

अपहरणकत्र्या महिलेस रेल्वेस्थानकाहून अटक

अकोला पोलिसांचे पथक नागपुरात
– अपहृत चिमुकला आश्रयार्थ शिशुगृहात
– २ महिन्यांपासून रामझुल्याखाली मुक्काम

नागपूर– : दोन वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करून नागपूर रेल्वे स्थानकावर राहत असलेल्या झारखंडच्या महिलेला अकोला लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी पकडले. दुपारच्या सुमारास अकोल्याचे पथक नागपुरात धडकले. रामझुला परिसरातून महिलेला अटक केली. लॉकडाऊन काळात गेल्या दोन महिन्यांपासून चिमुकल्यासोबत ही महिला रहात होती. आता तो चिमुकला मातृसेवा संघ शिशुगृहात सुखरुप आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली. सुमोली (५०) आणि तिची मुलगी अशी अपहरणकत्र्या मायलेकींची नावे आहेत. त्या झारखंडच्या राहणाèया असून, टॅट्यू काढण्याचे काम करतात. या घटनेमुळे त्या मायलेयी मुलं पळविणाèया तर नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

बाभळी नाका, दर्यापूर निवासी विजय पवार (फिर्यादी) मजुरी करतात. त्यांना ६ मुले आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांची पत्नी वडिलांना भेटण्यासाठी पंढरपूरला जाण्यास निघाली होती. दीड ते दोन वर्षाचा मुलगा असल्याने त्यालाही सोबत घेतले. अकोला रेल्वे स्थानकावर गेली. रेल्वे तिकीट केंद्राजवळील झाडाखाली ती थांबली होती. दरम्यान तिचा डोळा लागला. काही वेळात पाहते तर मुलगा नाही. तिने शोधाशोध केली. लोकांना विचारले. पतीला घटनेची माहिती दिली. मात्र, चिमुकला कुठेच आढळला नाही.

दरम्यान, कोरोनाने धडक दिली. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे चिमुकल्यास शोधणेही कठीण झाले. आरोपी सीमोली आणि तिची मुलगी रीता (२५) या दोघी अकोला रेल्वे स्थानकावरून नागपूरला जात होत्या. त्या हातावर टॅट्यू काढण्याचे काम करतात. त्यांनी त्या चिमुकल्यास नागपूरला आणले. नागपूर रेल्वे स्थानकाच्या रामझुल्याखाली त्या राहात होत्या. दोन वर्षाच्या चिमुकल्यास घेऊन एक महिला रेल्वे स्थानकावर बèयाच दिवसांपासून असल्याची माहिती रेल्वे चाईल्ड लाईनला मिळाली. त्यांनी गणेशपेठ पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.

दरम्यान, लॉकडाऊन संपताच ८ जून रोजी चिमुकल्याचे वडील विजय पवार (३९) यांनी अकोला लोहमार्ग ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असतानाच गणेशपेठ पोलिसांकडून एका चिमुकल्याचे छायाचित्र आले. खात्री केल्यानंतर उपनिरीक्षक सुनील भिसे, सहायक फौजदार खुशाल शेंडगे, पोलिस नायक गीता झामरकर, पोलिस शिपाई नितीन नखाते यांनी नागपूर गाठले. बुधवारी दुपारपर्यंत पथक नागपुरात पोहोचले. रामझुल्याखालून त्या महिलेस ताब्यात घेतले आणि सायंकाळी अकोल्यासाठी रवाना झाले. लवकरच तिच्या मुलीलाही अटक केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

लवकरच होईल खुलासा
आईच्या शोधात भटकलेल्या चिमुकल्यास त्यांनी आधार दिला की जाणीवपूर्वक अपहरण केले? याचा खुलासा पोलिस तपासात होईल. दरम्यान, त्या चिमुकल्यास नागपुरातील मातृसेवा संघ शिशुगृहात ठेवण्यात आले आहे. मुलगा सुखरुप असल्याची माहिती मिळताच त्या मातेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.