Published On : Thu, Nov 14th, 2019

नासुप्र येथे पंडित जवाहर लाल नेहरू यांची १३०वीं जयंती साजरी

नागपूर: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांची आज गुरुवार दिनांक, १४ नोव्हेंबर रोजी १३०वीं जयंती नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली.

नामप्राविप्रचे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार यांच्या हस्ते पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नामप्राविप्रच्या अधिक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, नासुप्रचे अधिक्षक अभियंता श्री. पी.पी. धनकर, नामप्रविप्राच्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री. लांडे, कार्यकारी अभियंता श्री. राजेश मेघराजानी आणि आस्थापना अधिकारी श्री. योगीराज अवदूत तसेच इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.