महाराष्ट्र सरकारच्या ‘तंबाखूमुक्त शाळा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर: राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे राज्यभरात या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
तंबाखूमुक्त शाळा अभियानातंर्गत आज गुरवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहर लाल नेहरू जयंतीनिमित्य साजरा होणाऱ्या बाल दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध शाळेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त समाज निर्माण कारणासाठी सैदव प्रयत्नशील राहणार असल्याची शपथ घेतली.
जवाहर लाल नेहरू प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, वाडी आणि धरमपेठ इंग्लिश मिडीयम शाळा, डिफेन्स या शाळेतील विद्यार्थ्यांना दिवेश कुमार यांनी तंबाखूसेवनाने होणारे दुष्परिणाम आणि जीवघेणे आजारापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनजागृती करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन सलाम मुंबई फाऊंडेशन आणि आरोही बहुद्देशीय संस्था, नागपूर यांच्यातर्फे करण्यात आले होते. यासाठी जवाहर लाल नेहरू प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षक श्री. विनोद देउडकर आणि श्री. दिनेश अडागले तसेच धरमपेठ इंग्लिश मिडीयम शाळेतील श्री. दीपक घुलाने आणि श्री. विजय मुनघाटे विशेष योगदान होते. याशिवाय अजय शर्मा, राजीव सुल्लेवार आणि अमित वांद्रे यांचे विशेष सहकार्य होते.