Published On : Thu, Nov 14th, 2019

धर्मराज प्राथमिक शाळेत बालकदिन साजरा

कन्हान : – येथील धर्मराज प्राथमिक शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालकदिन म्हणून उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आशा हटवार तर प्रमुख पाहुणे म्हणून आत्माराम बावनकुळे, चित्रलेखा धानफोले आदीच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू च्या प्रतिमेचे पुजन करून बालदिन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी आरुषी पवार व श्रृती खडसे या विद्यार्थ्यांनी नेहरूजीं च्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर आभार शारदा समरीत हयांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खिमेश बढिये, अमित मेंघरे, राजू भस्मे, किशोर जिभकाटे, हर्षकला चौधरी, पूजा धांडे, अपर्णा बावनकुळे, प्रिती सेंगर यांनी सहकार्य केले.