Published On : Mon, Jun 7th, 2021

धन्यवाद मोदीजी ; इतिहासातील एकमेवाद्वितीय प्रधानमंत्री : ऍड. धर्मपाल मेश्राम

नागपूर : शतकातील कोरोना महामारीच्या या संकटात देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे मोफत लसीकरण आणि दिवाळीपर्यंत देशातील सर्व कुटुंबांना मोफत रेशन देण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला.

देशातील सद्यस्थिती लक्षात घेता हा अत्यंत आवश्यक व मौलिक निर्णय आहे. असा निर्णय घेणारे नरेंद्र मोदी हे इतिहासातील एकमेवाद्वितीय प्रधानमंत्री आहेत, अशा शब्दांत भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले. येत्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल. केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवली जाईल. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार 80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या एका निर्णयामुळे देशातील कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोट्यवधी देशवासीयांचा सांगोपांग विचार करून हितकारक निर्णय घेणारा प्रधानमंत्री लाभण हे देशाचे भाग्य आहे, असेही ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.