Published On : Mon, Jun 7th, 2021

सोमवारी १४ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. ७ जून) रोजी १४ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,०१,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.