Published On : Tue, Jul 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

टीईटी पेपरफुटीचा भडका; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक!

राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
Advertisement

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणावरून राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने दादा भुसे यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, टीईटी पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले असून पालकांनाही मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी सरकारला थेट इशारा देत सांगितले की, पुढील सात दिवसांत राजीनामा न दिल्यास एनएसयूआय, युवक काँग्रेस आणि समविचारी संघटनांच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे अध्यक्ष सागर साळुंखे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत शिक्षण व्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप केला. शिक्षकांवर बीएलओसारख्या अशैक्षणिक जबाबदाऱ्यांचा वाढता बोजा टाकला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला.

Advertisement

यासोबतच नंदुरबारमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या कथित आर्थिक फसवणुकीचा मुद्दा, राज्यातील बोगस नर्सिंग महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्कावरही एनएसयूआयने सरकारला धारेवर धरले. शिक्षण विभाग महसूल कमावण्याचे साधन बनल्याचा आरोप करत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

दरम्यान, काँग्रेसच्या या आरोपांवर आणि राजीनाम्याच्या मागणीवर राज्य सरकार किंवा शिक्षणमंत्री दादा भुसे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.