Published On : Sat, Apr 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण दुर्घटना; टिपरच्या धडकेत युवक ठार, दोन मित्र जखमी

कामठी – नागपूर-जबलपूर महामार्गावरील कामठी परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

शाहरुख खान आणि त्याचे दोन मित्र मोटरसायकलवर ट्रिपलसीट बसून कन्हानहून कामठीकडे जेवणासाठी निघाले होते. जेवणानंतर ते परत कन्हानकडे जात असताना, रात्री सुमारे ११.३० वाजता न्यू खलासी लाईनजवळ महात्मा फुले पुतळ्याच्या परिसरात त्यांच्या दुचाकीला मागून वेगात आलेल्या टिपरने जोरदार धडक दिली.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अपघातामुळे तिघेही रस्त्यावर दूरपर्यंत फेकले गेले. धक्कादायक प्रकार म्हणजे, टिपरचे पुढचे चाक थेट शाहरुखच्या पायावरून गेले. त्याचे दोन्ही मित्रही गंभीर जखमी झाले. धडकेनंतर मोटरसायकल टिपरला अडकल्याने वाहनचालकाने ती काही अंतर फरफटत नेली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी टिपर थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालक वाहन सोडून पळून गेला. जखमींना तात्काळ कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाहरुखची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कामठी पोलिसांनी काही वेळातच टिपर चालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शाहरुखच्या कुटुंबीयांनी मेट्रो प्रकल्पातील सुरू असलेल्या कामांमुळे व महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप केला असून, त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement