नागपूर: रमाई घरकुल योजनेअंतर्गत नागपूर महापालिकेने ११२ कोटी ४० लाख रुपयांचा निधी खर्च केला असून यातून ५७९५ कुटुंबांना नवे घरकुल मिळाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घर या संकल्पनेला साकार करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी या योजनेला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पावले उचलली आहेत. नागपूर शहरातील अनुसचित जाती व नवबौद्धासाठी “रमाई घरकुल योजना” महापालिकेच्या स्लम विभागामार्फत राबविण्यात येत आहे. शासन निर्णय २०१७ नुसार ३ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या शहरातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनंअंतर्गत आतापर्यंत ५७९५ लाभार्थ्यांना स्लम विभागाद्वारे नागपूर महानगरपालिकेमार्फत योजनेचा लाभ देण्यात आला आहे. महापालिकेतर्फे चालू आर्थिक वर्षात जवळपास १५०० नवीन लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. आतापर्यंत एकून १४२ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून ११२ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे.
१ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान रमाई घरकुल योजनेचा प्रचार व प्रसार करण्याकरीता महापालिकेद्वारे झोननिहाय शिबीरे मा. आयुक्त मनपा तथा प्रशासक, समाज कल्याण आयुक्त यांचे अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली होते. यात जवळपास २५०० नवबौद्ध व अनुसूचित जातीचे घरकुल करीता अर्ज प्राप्त झाले. गेल्या आर्थिक वर्षात ११०७ नवीन घरकुल बांधण्याकरीता मंजुरी देण्यात आली. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात २५०० नवीन घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
झोननिहाय लाभार्थ्यांची संख्या
झोन
लाभार्थी संख्या
लक्ष्मीनगर झोन क्र.१
५५८
धरमपेठ झोन क्र.२
५५२
हनुमाननगर झोन क्र.३
६०९
धंतोली झोन क्र. ४
३४७
नेहरुनगर झोन क्र. ५
४२३
गांधीबाग झोन क्र. ६
२१९
सतरंजीपूरा झोन क्र. ७
५१३
लकडगंज झोन क्र. ८
३९८
आशीनगर झोन क्र. ९
१६९५
मंगळवारी झोन क्र. १०
४८१