Published On : Sat, Apr 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार; अनेक बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Advertisement

नागपूर – जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला बोढारे यांच्यासह १६ सरपंच, ६ नगरसेवक आणि १२ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे हिंगणा विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद अधिक बळकट झाली आहे.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या वेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, उज्वला बोढारे यांसारख्या अनुभवी आणि सक्रिय नेत्या तसेच मोठ्या प्रमाणावर स्थानिक प्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला निर्णायक यश मिळणार आहे. हिंगणामधील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश बंग यांना मिळालेली मते आता भाजपकडे वळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भाजपचा विजय सुनिश्चित होईल.”

या कार्यक्रमाला भाजपचे माजी आमदार राजू पारवे, प्रदेश उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, जिल्हा महामंत्री अनिल निधान, आदर्श पटले, बिपीन गिरडे, विवेक इंदूरकर, विनायक खराबे, अश्विनी जिचकार, भास्कर खाडे आणि अमित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement